Ac Local  Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur: साधी लोकल रद्द करून एसी लोकल नकोच; प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

एसी लोकलसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करा; संतप्त प्रवाशांनी घेतला स्टेशन मास्तरांना घेराव

अजय दुधाणे

बदलापूर - गर्दीच्या वेळी साधी लोकल रद्द करून एसी लोकल (AC Local) सुरू करू नका, एसी लोकलसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करा, अशी मागणी बदलापूरच्या (Badlapur) रेल्वे प्रवाशांनी केली आहे. काल बदलापूर रेल्वे स्थानकात एसी लोकलच्या विरोधात संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घातला होता.

हे देखील पाहा -

बदलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून त्या तुलनेत बदलापूर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या अतिशय कमी आहे. त्यात संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी मुंबईहून येणारी ५.२२ ची सीएसएमटी बदलापूर लोकल रद्द करून त्याजागी एसी लोकल सुरू झाल्याने एसी लोकल रिकामी जाते आहे.

तर गर्दीचा सगळा भार मागून येणाऱ्या खोपोली लोकलवर पडत असून या लोकलमध्ये शिरायलाही जागा नसल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. तसंच एसी लोकल सुरू करायला आमचा विरोध नसून साधी लोकल रद्द करून त्याजागी एसी लोकल सुरू करण्यास आमचा विरोध असल्याचं प्रवाशांनी स्पष्ट केलं. सोबतच बदलापूर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवण्याची मागणी देखील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Edited by - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT