पुणे : कोरोना Corona संकटाचे संकट कमी झालेले नाही तरीही डेल्टा प्लसचे Delta Plus रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच आता राज्याच्या पुणे शहरातही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळलेला आहे. शहरात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण आढळला असून जिल्ह्यातील एकूण डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या सहा 6 एवढी झाली आहे. राज्यात 80 टक्क्यांहून ८०% अधिक नमुन्यांमध्ये Tests डेल्टा व्हेरियंट आढळत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत या केलेल्या सर्वेक्षणातून Survey राज्यात 66 डेल्टा प्लस व्हेरीयंटचे Variant रुग्ण सापडले.
राज्यात ‘डेल्टा प्लस’ च्या रुग्ण बाधितांपैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मृतांची संख्या रत्नागिरीत दोन, तर मुंबई मध्ये एक, बीड मध्ये एक आणि रायगड येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आश्चर्य म्हणजे बाधितांपैकी दहा जणांनी कोरोना लशीच्या दोन्ही डोस घेतलेल्या आहेत. तसेच या पाच जणांपैकी दोन जणांनी कोविशिल्ड covishield लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या होत्या, तर दोघांनी कोणतीही लस Vaccine घेतेलेली नव्हती.
मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी;
दरम्यान, मुंबईमध्ये डेल्टा प्लस Delta Plus व्हेरिएंटच्या पहिल्या रुग्णाच्या मृत्यूची Death नोंद करण्यात आली होती. मुंबई Mumbai महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला होता. दरम्यान, मुंबईत ११ डेल्टा प्लसचे रूग्ण होते. त्यापैकी आता एकाचा मृत्यू झाला होता. महत्त्वाचे म्हणजे या रुग्णाने कोरोनाच्या लशीचे दोन्ही डोस घेतले होते.
मुंबईतील ५५ वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला होता. या महिलेला मधुमेहासह इतर आजारही होते. ही महिला घरीच ऑक्सिजनवर होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. गोमारे यांनी दिली होती.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.