Arun Gawli  Saam tv
मुंबई/पुणे

Arun Gawli News: चुकीला माफी नाहीचं! डॉन अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दणका; मुदतपूर्व सुटकेच्या निर्णयाला स्थगिती

Underworld Don Arun Gawli Supreme Court: कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली. ता. ३ जून २०२४

कुख्यात गुंड अरुण गवळीच्या सुटकेला नकार देत सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठने गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अरुण गवळी याची सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय दिला होता. याविरोधात राज्य सरकारने ही याचिका दाखल करण्यात आली होती. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या बेंचसमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी ही एक धोरणात्मक बाब आहे. हायकोर्टाने २००६ च्या धोरणावर विश्वास ठेवत हा निर्णय दिला असल्याचे नमूद करत सुप्रीम कोर्टाने अरुण गवळी याची मुदतपूर्व सुटका करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निकालामुळे अरुण गवळी याची सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी ऑगस्ट २०१२ साली गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या गुन्ह्यात गवळी सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. पण, वय झालेल्या आणि शरीराने अशक्त असलेल्या कैद्यांना मुदतपूर्व सोडण्यासाठी सरकारने लागू केलेल्या २०१६ च्या धोरणाचा आधार घेत गवळीने सुटकेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT