Dehu Road , Maval, Kiwale Talathi Office saam tv
मुंबई/पुणे

Dehu Road News: देहूरोड तलाठी कार्यालय आठवड्यापासून कुलूपबंद; नागरिक संतप्त

प्रशासनाने लवकरात लवकर तलाठी कार्यालय सुरु करावे अशी मागणी हाेऊ लागली आहे.

दिलीप कांबळे

Maval News : मावळ (maval) येथील देहुरोड (dehuraod) असलेले किवळे रावेत तलाठी कार्यालय (talathi office) गेल्या सात ते आठ दिवसापासुन बंद (bandh) राहिले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी (farmers) तसेच अन्य ग्रामस्थांची (villagers) मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. (Maharashtra News)

तलाठी कार्यालयात सात बारा काढणे, नोंदी करणे, वारस नोंद , उत्पन्नाचा दाखला काढ़णे अशा विविध कामासाठी नागरिक रोज किवळे तलाठी कार्यालयाकड़े येतात. परंतु कार्यालय बंद असल्याने नागरिकांची, शेतक-यांची कामे ठप्प झाली आहेत. तसेच त्यांना हेलपाटा पडत असल्याने आर्थिक भुर्दंड साेसावा लागत आहे.

मागील आठवड्यात याच कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पोलिसांनी एका खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्याला पस्तीस हजाराची लाच (bribe) मागताना रंगेहाथ पकडले. तेव्हापासुन हे तलाठी कार्यालय बंदच राहिले आहे. दरम्यान चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (chinchwad vidhansabha byelection) कामात सर्व कर्मचारी व्यस्त आहेत. त्यामुळे देहूरोड तलाठी कार्यालय बंद असल्याचे हवेली तहसीलदार गीता गायकवाड (tashildar geeta gaikwad) यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पालघरमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर NDRFचे जनजागृती प्रशिक्षण

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

SCROLL FOR NEXT