maval, dehu saam tv
मुंबई/पुणे

Dehu : तुकाराम महाराज बिजोत्सवापुर्वी इंद्रायणी नदीचा पूल दुरुस्त करा; देहूकरांची मागणी

श्री संत तुकाराम महाराजांची चिंतनभूमी असलेल्या भंडारा डोंगर व भामचंद्र डोंगरावर भाविक जातात.

दिलीप कांबळे

Dehu News : मावळ (maval) येथील येलवाडी देहू मार्गावर इंद्रायणी नदीवरील (indrayani river) पुलाचे सुरक्षा कठडे तुटले आहेत. तसेच हा पूल (bridge) वाहतुकीस बंद असल्याचा फलक देखील तुटल्याने.या भागात अपघात (accident) घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलाचे कठडे प्रशासनाने तात्काळ दुरुस्त करावे किंवा हा पूल वाहतुकीसाठी बंद करावा अशी मागणी देहू ग्रामस्थांनी (dehu villagers) केली आहे.

श्रीक्षेत्र देहुगाव येथे अवघ्या काही दिवसावर येऊ घातलेल्या तुकाराम महाराज बिजोत्सवाच्या (tukaram maharaj beej) अगोदर हे दुरुस्तीचे काम करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. श्रीक्षेत्र देहुगाव हे श्री संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान असल्याने राज्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.

तुकाराम बीज सोहळा निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक (devotees) दर्शनासाठी देहूमध्ये दाखल होत असतात. दरम्यान आषाढी वारी (ashadhi wari), कार्तिकी एकादशी वारी (kartiki ekadashi) व तुकाराम बीज या यात्रांना देहूत वारकऱ्यांची मांदियाळी असते.

या मार्गाने श्री संत तुकाराम महाराजांची चिंतनभूमी असलेल्या भंडारा डोंगर व भामचंद्र डोंगरावर भाविक जात असतात. भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर येथे दर्शन घेऊन देहूत येणाऱ्या भाविकांकडून इंद्रायणी नदीच्या पुलाच्या तोंडावरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. (Maharashtra News)

हा कचरा थेट इंद्रायणी नदीपत्रात जातो. त्यामुळे जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. हा भाग येलवाडी गावच्या हद्दीत येत असल्याने यावर संबंधित ग्रामपंचायतीने सुद्धा कारवाई करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल प्रकरणात नवीन अपडेट, केतनला सिया आणि चेतनचा होता संशय

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी डेब्यू कधी करणार? आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही नाही मिळाली संधी

धारशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट, पवनराजेंची हत्या, संजय राऊतांचा ओमराजे निंबाळकरांवर वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT