dehu to dehu road palkhi marg widening work is must demands villagers Saam Digital
मुंबई/पुणे

देहू ते देहूरोड अरुंद पालखी मार्ग चौपदरीकरणाला मुहूर्त कधी? वारकऱ्यांसह स्थानिकांना प्रतिक्षा रस्त्याची

dehu to dehu road palkhi marg widening work is must demands villagers: श्रीक्षेत्र देहू ते देहूरोड रस्ता, लष्करी भागातील रस्ते तसेच मुंबई पुणे महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत असल्याने स्थानिकांसह विद्यार्थी, कामगार, वाहतूकदार व इतर प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते.

दिलीप कांबळे

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग चौपदरीकरण पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटस येथून होत असून त्याचे काम वेळापूरपर्यंत वेगात सुरु आहे. मात्र देहू या तुकोबारायांच्या जन्मगावापासून अर्थात श्रीक्षेत्र देहू ते देहूरोड हा अवघा पाच किलोमीटरचा अरुंद पालखी मार्ग चौपदरीकरण तसेच देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्ते सुधारणा कामाचा संबंधित कामांत समावेश अदयाप झालेला नसल्याने देहू ते देहूरोड रस्त्याच्या चौपदरीकरणाला मुहूर्त कधी लागणार? असा सवाल वारकऱ्यांसह भाविक व स्थानिक करु लागले आहेत.

श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर पालखीच्या विविध मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याकडे प्रयत्न होताना दिसतात. मात्र संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जाण्यासाठी श्रीक्षेत्र देहूतून प्रस्थान ठेवते. त्याच देहू गावापासून देहूरोडपर्यंतच्या पाच किलोमीटर अंतराच्या पालखीमार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा झालेली असताना देखील चौपदरीकरण कामास अद्यापही सुरुवात केलेली नाही.

श्रीक्षेत्र देहू ते देहूरोड दरम्यानचा पालखी मार्ग अरुंद असल्याने वारकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. पालखी सोहळा देहूतून मार्गस्थ झाल्यानंतर दिंड्यांची सर्व वाहने देहूतून देहूरोड मार्गे न नेता तळवडेमार्गे आकुर्डी मुक्कामी पाठविली जातात. परिणामी दुपारच्या विश्रांतीच्यावेळी दिंडीतील वारकरी यांच्या जेवणाचे खूप हाल होतात असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

...तर गैरसाेय टळेल

श्रीक्षेत्र देहू ते देहूरोड पालखी मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरु होणे अपेक्षित होते. प्रशासनाने वाढत्या वाहनसंख्येचा व मंजुरी प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता देहू ते देहूरोड पुढे निगडी रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचे नियोजन केल्यास भविष्यात नियमित ये-जा करणाऱ्या वारकरी समाजासह स्थानिकांची गैरसोय होणार नाही हे मात्र निश्चित.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT