Pune Local Train Cancelled Tomorrow Due to Subway Work at Dehu Road-Begdewadi; Check Express Timings Here SAAM TV
मुंबई/पुणे

Railway Block : देहूरोड–बेगडेवाडी दरम्यान उद्या रेल्वे ब्लॉक; लोकल रद्द, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत बदल

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील देहूरोड आणि बेगडेवाडी स्थानकांदरम्यान पादचारी भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी विशेष रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे पुणे-लोणावळा मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Saam Tv

सचिन जाधव, पुणे

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील देहूरोड आणि बेगडेवाडी स्थानकांदरम्यान पादचारी भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे पुणे–लोणावळा मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असून, काही उपनगरी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

आरसीसी बॉक्स बसवण्याचे काम

पुणे–लोणावळा विभागातील देहूरोड आणि बेगडेवाडी स्थानकांदरम्यान आरएच गर्डर पद्धतीने आरसीसी सेगमेंटल बॉक्स बसविण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी रविवारी सकाळी ११:४० ते दुपारी ०३:४० वाजेपर्यंत अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवर चार तासांचा ट्रॅक ब्लॉक घेतला जाणार आहे.

बदलेले वेळापत्रक आणि रेल्वे सेवांचा तपशील:

  • उपनगरी लोकल गाड्या रद्द

  • रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे–लोणावळा मार्गावरील खालील चार लोकल गाड्या पूर्णपणे रद्द राहतील

  • गाडी क्र. ९९८१४: पुणे ते लोणावळा लोकल

  • गाडी क्र. ९९८१८: पुणे ते लोणावळा लोकल

  • गाडी क्र. ९९८१३: लोणावळा ते पुणे लोकल

  • गाडी क्र. ९९८१७: लोणावळा ते शिवाजीनगर (SVJR) लोकल

एक्सप्रेस गाडी मार्गात थांबवून नियंत्रित करणार

गाडी क्र. १२१६४ एमजीआर चेन्नई सेंट्रल ते मुंबई एलटीटी एक्सप्रेस शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरू करणारी ही गाडी सोलापूर किंवा पुणे विभागात ३ तास ३० मिनिटे नियंत्रित केली जाईल .

एक्सप्रेस गाडीच्या सुटण्याच्या वेळेत बदल

गाडी क्र. ११०२९ सीएसएमटी मुंबई ते कोल्हापूर एक्सप्रेस रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सीएसएमटी मुंबई येथून सकाळी ०८:४० वाजता सुटणारी ही गाडी ३ तास ३० मिनिटे उशिराने म्हणजेच दुपारी १२:१० वाजता सुटेल.

प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती आणि सुधारित वेळापत्रक तपासून घ्यावे. यासाठी भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा मोबाईलमधील NTES (National Train Enquiry System) ॲपचा वापर करावा.

पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि भविष्यातील रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी हे काम अत्यंत आवश्यक आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice or Chapati: भात की चपाती? शरीराला जास्त एनर्जी, फायबर आणि प्रोटीन कशातून मिळते? जाणून घ्या ७ गोष्टी

Maharashtra News Live Update: 9 व्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेचा समारोप सोहळा

Heart Transplant: वाडिया रुग्णालयात पहिल्यांदाच यशस्वी हृदय प्रत्यारोपण, 17 वर्षीय मुलाला नवं आयुष्य; ग्रीन कॉरिडॉरमुळे 25 मिनिटांत पोहोचलं हृदय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! या महिन्याच्या शेवटी खात्यात पैसे जमा होणार , ₹1500 की ₹3000 मिळणार? वाचा...

Bank Holiday: सलग तीन दिवस बँका बंद; तुमच्या शहरात कधी असणार सुट्टी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT