Eknath Shinde News  Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : ठाकरेंना मोठा धक्का, माजी मंत्री दीपक सावंतांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

मुंबई : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंना साथ दिली आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे शिवसेनेमध्ये स्वागत करतो. बाळासाहेब यांच्या विचारांवर प्रभावित होऊन यांनी दुर्गम भागात कुपोषण कमी करण्यासाठी काम केलं. त्याचा परिणाम देखील पाहायला मिळाला'.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'अगदी शासकीय रुग्णालयात अडचणी आहेत. त्यावर देखील मोठं काम केलं. आरोग्यमंत्री असताना मोठी सेवा दिली. अतिशय कमी बोलणारे पण जास्त काम करणारे अशी यांची ओळख आहे. आम्ही बाळासाहेब यांचे विचारांवर मार्गक्रमण करत असताना गेल्या सहा-सात माहिन्यात जे काम केलंय, ते त्यांनी जवळून पाहिले आहे'.

'बाळासाहेब यांचे ते कार्यकर्ते होते. तसेच त्यांचे डॉक्टर सुद्धा होते. त्यांना दुर्दैवाने काम थांबवायला लागलं होतं. कम्पलसरी रिटायरमेंट करावी लागली. पण काम करणारा माणूस काम करत असतो, असेही ते म्हणाले.

'दीपक सावंत यांनी आरोग्य विभाग सक्षमपणे सांभाळाला आहे. आज ते शिवसेना (Shivsena) मध्ये प्रवेश करत आहेत. संघटना पातळीवर त्यानांचा फायदा होईल. राज्यातील रुग्णालयात त्यांचा फायदा होईल. त्या कामात त्यांच्या अनुभवाचा नक्की फायदा होईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

कोण आहेत दीपक सावंत?

दीपक सावंत (Deepak Sawant) हे विधानपरिषदेचे माजी सदस्य होते. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.जुलै २००४ मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर २००६ आणि २०१२ मध्ये ते पुन्हा निवडून आले.

डिसेंबर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. याचवेळी त्यांच्याकडे भंडारा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT