Maharashtra Politics : Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राज ठाकरे यांच्या विधानसभेच्या स्वबळाच्या नाऱ्याने महायुतीचं टेन्शन वाढलं? मंत्री दीपक केसरकर म्हणाले...

Deepak Kesarkar News : मनसेच्या विधानसभेच्या स्वबळाच्या नाऱ्याने महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. राज ठाकरे यांच्या स्वबळाच्या भूमिकनेनंतर मंत्री दीपक केसरकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. मनसेच्या स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याच्या भूमिकेने महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर महायुतीतील मंत्री दीपक केसरकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीने राज ठाकरेंशी चर्चा केली नसून चर्चेनंतर त्यांचं मतपरिवर्तन होईल, अशी आशा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी पक्ष कार्यालयात ये-जा सुरु केली आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. राज ठाकरेंनी भरसभेत २०० हून अधिक जागा आगामी विधानसभेत लढणार असल्याचे जाहीर केले.

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर महायुतीच्या गोटात चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महायुतीचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. राज ठाकरे म्हणाले, पक्षातील सहकारी आम्हाला काही करून सत्तेत बसवायचे आहेत. पक्षातील टीम कार्यकर्त्यांपर्यंत पोहेचेल. यादरम्यान, आपली युती होईल का? आपल्याला किती जागा मिळेल? असा कुठलाही विचार मनात आणू नका. आपण २२५ ते २५० जागा लढवणार आहोत'.

राज ठाकरे यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मंत्री दीपक केसरकर म्हणाले की,'राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते आमच्या विचारांचे नेते आहेत. पीएम मोदींनी केलेला विकास त्यांना आवडतो. ज्या दिवशी त्यांच्याशी बोलणं होईल. त्यावेळी त्यांचं मतपरिवर्तन होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT