Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case Saam Tv News
मुंबई/पुणे

Deenanath Hospital: तनिषा भिसे प्रकरणी सरकार आक्रमक; डॉ. घैसासांवर कारवाईची कुर्‍हाड, रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड

Tanisha Bhise Death Case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे भाजप आमदाराचे स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी आज महाराष्ट्र कौन्सिलची सुनावणी झाली.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी सरकारने आक्रमक भूमिका घेतलीय. प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई करण्यात येणार आहे. आज महाराष्ट्र मेडिकल कैन्सिलसमोर याप्रकरणी सुनावणी पडली. यावेळी भिसे कुटुंबीयांनी डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली.

दरम्यान मेडिकल कौन्सिलच्या सुनावणीवेळी डॉ. घैसास गैरहजर होते, त्याबाबत त्यांनी वैद्यकीय समितीला माहिती दिली होती. या सुनावणीत तनिषा मृत्यू प्रकरणी कोण-कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती देण्यात आलीय. भिसे मृत्यू प्रकरणी तीन प्रकारे चौकशी करण्यात आलीय. कोण-कोणत्या विभागामार्फत रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली त्याचा अहवाल खालीलप्रमाणे-

वैद्यकीय शिक्षण विभागाची चौकशी-

पुणे पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्यासाठी अहवाल देण्यात आलाय.

सार्वजनिक आरोग्य विभाग चौकशी

इंडियन मेडिकल कौन्सिलच्या व्यावसायिक नियमांचे उल्लंघन झाल्याने मेडिकल कौन्सिलच्या माध्यमातून डॉ. घैसास आणि त्यांच्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. डॉ. घैसास आणि त्यांच्या कर्मचार्‍यांवर इंडियन मेडिकल कौन्सिलच्या व्यावसायिक नियमांचे उल्लंघन झाल्याने मेडिकल कौन्सिलच्या माध्यमातून कारवाई करण्यात यावी.

महाराष्ट्र सुश्रुषागृह नोंदणी नियम 2021 नुसार पुणे महापालिकेने कार्यवाही करावी.मुंबई पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट 1950 चा भंग झाल्याने विधी व न्याय विभागाने धर्मादाय आयुक्तांमार्फत कारवाई करावी.

विधी व न्याय विभाग चौकशी

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड. यात दोन्ही मुलींच्या नावे 5-5 लाखांची एफडी केली जाणार. दोन्ही मुली सज्ञान झाल्यावर व्याजासह त्यांना ही रक्कम द्यावी लागणार. या दोन्ही मुलींच्या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून केला जाणार आहे. दरम्यान याचा निर्णय आधीच घेण्यात आलाय.

धर्मदाय रुग्णालयाच्या व्यवस्थेतील प्रस्तावित मोठे बदल

आता धर्मदाय रुग्णालयातील रुग्णसेवा ही संपूर्णत: ऑनलाईन ठेवावी लागणार. त्यांचे केंद्रीय स्तरावरून नियोजन मुख्यमंत्री धर्मदाय कक्षाच्या माध्यमातून होईल. धर्मादाय रुग्णालयात येणार्‍या कोणत्याही रुग्णाला अ‍ॅडव्हान्स मागता येणार नाही. धर्मादाय रुग्णालयाने 10 टक्के निधी हा गरिब रुग्णांसाठी वापरला की नाही, याचे लेखे नियमितपणे सादर करावे लागणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT