मुंबई : आज हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही आवाजी मतदान पद्धतीनं घेण्याबाबत निर्णय होणार आहे. (Decision about maharashtra assembly chairperson likely today)
विधानसभेच्या अधिवेशनात (Assembly Session) पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधासनभा अध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने घेण्यात यावी अशा स्वरुपाचा प्रस्ताव मांडला होता. आज नियम समिती या प्रस्तावाचं अवलोकन करून आवाजी मदतानाने अध्यक्षपद निवड करण्याबाबत निर्णय घेऊ शकते.
याकरता सूचना व हरकतींचा विचार करुन दुपारपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणूकीच्या पद्धतीबाबतचा निर्णय जाहिर केला जाईल. महाराष्ट्रासह (Maharashtra) उत्तर प्रदेश, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अध्यक्ष निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. हाच नियम महाराष्ट्रात बदलण्यात आला आहे. दरम्यान काँग्रेस (Congress) कडून येत्या सोमवारी अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला जाईल असे सांगण्यात येत आहे.
कोणकोणती नावे आहेत चर्चेत
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे (Indian National Congress) राहील...त्यामुळे काँग्रेसमधून या पदासाठी संग्राम थोपटे तर शिवसेनेकडून काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह असल्याचं समजतंय.
Edited By - Amit Golwalkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.