दुःखद! 'त्या' चिमुकल्याचा मृतदेह आढळला गोबर गॅसच्या टाकीत... रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

दुःखद! 'त्या' चिमुकल्याचा मृतदेह आढळला गोबर गॅसच्या टाकीत...

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथून बेपत्ता झालेल्या चिमुकल्या मुलाचे मृतदेह गोबर गॅसच्या टाकीत आढळून आला आहे.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे: आंबेगाव Ambegaon तालुक्यातील शिंगवे येथून बेपत्ता झालेल्या चिमुकल्या मुलाचे मृतदेह गोबर गॅसच्या टाकीत आढळून आला आहे. काल दिवसभर शोध घेतल्यानंतर मुलगा सापडला नव्हता, त्यानंतर आज सकाळी घरासमोर घराच्या बाजूला असलेल्या गोबरगॅसचा टाकीत या मुलाचा मृतदेह सापडला आहे.

हे देखील पहा-

शिंगवे येथील गाढवे वस्तीत घरासमोर खेळणारा कृष्णा विलास गाढवे या दोन वर्षांचा मुलगा काल अचानक बेपत्ता झाला असल्याची घटना घडली होती. या मुलाला बिबट्याने पळवून नेल्याची चर्चा स्थानिक नागरिकां मध्ये सुरू होती. त्यासाठी वनविभागाने येथील ऊस शेतात मुलाला शोधण्याची मोहीम सुरु केली होती.

मात्र काल दिवसभर शोधूनही मुलाचा पत्ता लागला नव्हता. त्यानंतर आज सकाळी गाढवे कुटुंबीय मुलाचा शोध घेत असताना सकाळी घराच्या बाजूला असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आलाय कृष्णा घराच्या बाजुलाच खेळत असताना अचानक गोबर गॅसच्या टाकीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

SCROLL FOR NEXT