Devendra Fadnavis-Abdul Sattar Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य अतिशय चुकीचंच, देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांनाही सुनावलं

अब्दुल सत्तार चुकले आहेत, पण खोक्यांची भाषा देखील योग्य नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या टिकेवरुन राज्यात अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही म्हटलं की, अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य चुकीचंच आहे. याच कुणीही समर्थन करणार नाही.

कुणीही महिलाबद्दल अपशब्द काढू नये. ते अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोध करतो. मात्र जसे आमच्या लोकांना जसे नियम लागू आहे तसे त्यांना देखील लागू आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी याची काळजी घेणे गरजेचं आहे. राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

अब्दुल सत्तार चुकले आहेत, पण खोक्यांची भाषा देखील योग्य नाही. राजकारणामध्ये एकमेकांविरोधात बोलताना पातळी सोडून बोललं जात आहे. सगळीकडच्या लोकांनी आचारसंहिता पाळली पाहिजे. मोठ्या नेत्यांनी आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे. ते जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत हे शक्य नाही , असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

काय म्हणाले होते सत्तार?

माध्यमांना प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवीगाळ केली होती. इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.

...तर कारवाई केली जाईल

हर हर महादेव चित्रपटाला जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विरोधाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, मी सिनेमा पाहिलेला नाही. त्यात काय वाद आहे मला माहित नाही. कुणाला जर त्याबद्दल आक्षेप असतील तर त्यांनी सनदीशीर पद्धतीने मांडावे. पण अशा पद्धतीने कुणी थिएटरमध्ये घुसून लोकांना मारत असेल तर ते सहन केले जाणार नाही कारवाई केली जाईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्..., कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT