Dattatray Gade Shirur Saam Tv
मुंबई/पुणे

Dattatray Gade : कोण ऊसाच्या फडात घुसलं, कोणी पाणी दिलेल्या शेतात पळत सुटलं; दत्ता गाडेचा शोध घेताना पोलिसांची दमछाक; तरीही निराशा

Pune Crime News : स्वारगेट डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचा पोलीस शिरूरमध्ये शोध घेत आहेत. २५ एकर शेतात शोधूनही दत्ता गाडे पोलिसांच्या हाती लागला नाही अशी माहिती समोर आली आहे.

रोहिदास गाडगे

Dattatray Gade : पुण्याच्या स्वारगेट डेपोमधील बलात्कार घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. तो शिरूरमधील गुनाट गावात त्याला शोधण्यासाठी पोलीस दल दाखल झाले होते. या शोधमोहीमेच्या संबंधित माहिती समोर आली आहे. पोलीस पथकाला परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडेच्या शोधमोहिमेला गेलेल्या पोलीस पथकाला परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांसह गुनाट गावचे ग्रामस्थ देखील शेतात तपासासाठी गेले होते. ग्रामस्थांचे पथक देखील पोलिसांसह परतणार आहे. यावरुन अजूनही दत्ता गाडेचा शोध लागलेला नाही हे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांसह ग्रामस्थांच्या पथकांनी तब्बल २५ एकरच्या परिसरातील शेतशिवारात जाऊन तेथील पाहणी केली. तरीही दत्ता गाडेचा शोध लागला नसल्याने शोध पथकांना परत येण्यास सांगण्यात आले आहे. या दरम्यान दत्तात्रय गाडे कुठू लपून बसला आहे आणि तो कधी सापडणार कधी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

१०० पोलीस, ड्रोन, श्वान पथकांनी दत्ता गाडेचा शोध घेण्यात आला. २५ एकर शेतात पहाणीकरुनही आरोपी न सापडल्याने तेथील शोधमोहीम थांबण्यात आली. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने आणि अंधार पडायला सुरुवात झाल्याने पथक परतले. मात्र लवकरच दत्तात्रय गाडेला शोधणार असा ठाम विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT