Dattatray Gade Arrested 
मुंबई/पुणे

Dattatray Gade Arrested : ड्रोन, १०० पोलिसांची फौज, श्वानपथक; दत्ता गाडेच्या अटकेचा घटनाक्रम, ७५ तासांत काय झालं? सगळं एकाच क्लिकवर

Dattatray Gade Arrested :मध्यरात्री दीडच्या सुमारास गुनाट गावात थरारानंतर दत्ता गाडे याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतात लपून बसला होता. ७५ तासांमध्ये नेमकं काय काय घडलं?

Namdeo Kumbhar, रोहिदास गाडगे

Pune Swargate Shivshahi Case Dattatray Gade Arrested : पुण्यातील गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. फलटणला जाणाऱ्या २६ वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता बलात्कार केला. त्यानंतर पुण्यात संतापाची लाट उसळली, स्वारगेट बस स्थानकात आंदोलनं झाली, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. ("Swargate Rape Case: Drones, Villagers, and 100 Police in Action as Dattatray Gade Surrenders")

दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला १ लाखाचे बक्षीस जाहीर कऱण्यात आले. पालकमंत्री अजित पवार यांनाही प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पुणे पोलिसांची १३ पथके दत्ता गाडे याच्या मागावर होती, पण तो शिरूरमधील गुनाट गावात दबा धरून बसला होता. अखेर मध्यरात्री त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. दत्ता गाडे याच्या अटकेचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात, नेमकं काय काय घडलं?

दत्ता गाडे याच्या अटकेचा संपूर्ण घटनाक्रम

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात बलात्कारानंतर दत्ता गाडे हा शिरुर तालुक्यातील गुनाट गावातील घरी पोहचला.

सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत घरातच आराम केला.

रात्री ८:३० वाजता एका घरात पाणी घेऊन ऊसाच्या शेतात मुक्कामाला गेला.

सकाळी ६ वाजता पुणे पोलीसांची तपास पथके गुनाट गावात दाखल झाले.

पोलिसांची 13 तपास पथक दत्ता गाडे याचा शोध घेण्यासाठी तैणात होती.

पुणे पोलीसांकडून गुनाट गावात दत्ता गाडे याचा शोध घेण्यात आला.

दुपारी १ वाजता ड्रोन कॅमेरातून ऊसाच्या शेत-शिवारात टेहाळणी करण्यात आली.

१:३० श्वान पथकाकडून गुनाट गावात तपासणी करण्यात आली.

श्वान पथक, ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यात येत होता.

सायंकाळी ४ वाजता १०० पोलीसांचे तपासणी पथक तैनात

ग्रामस्थांचा पोलिसांसोबत ऊसाच्या शेतशिवात रेस्क्यू

रात्री ११ वाजता श्वान पथकाकडून संपूर्ण गावात पाहाणी करण्यात आली.

१२ वाजता दत्ता गाडे गावात दाखल होता, एका घरात पाणी बॉटल घेऊन पुन्हा शेतात गेला.

ऊसाच्या शेतालगत पाण्याच्या चारीजवळ (कॅनोल) वास्तव्य केलं.

गावचे दडपण,पोलीस कारवाईची धास्ती मुळे दत्ता गाडेचे मानसिक संतुलन बिघडलं.

रात्री १:३० वाजता दत्ता गाडे ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर पुणे पोलीसांच्या ताब्यात

दत्ता गाडेकडे रोगर औषधाची बॉटल मिळाली.

दत्ता गाडे आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत होता असा गावा गुनाट ग्रामस्थांनी केला.

१:४५ मिनिटांनी दत्ता गाडे पुण्याकडे रवाना झाला.

मध्यरात्री ३ वाजता दत्ता गाडे याला घेऊन पोलिस लष्कार स्थानकात पोहचले.

सकाळी सकाळी ससून रूग्णालयात दत्ता गाडे याची याची वैदकीय तपासणी करण्यात आली.

आरोपी दत्ता गाडे याला आज दुपारी तीन वाजता शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saina Nehwal: सायना नेहवाल - पारूपल्ली कश्यप विभक्त, ७ वर्षांचा सुखी संसार मोडला; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT