Sushma Andhare
Sushma Andhare  Saam TV
मुंबई/पुणे

Dasara Melava: 'तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून आयात...', सुषमा अंधारेंना शिंदे गटाचं जोरदार प्रत्युत्तर

Jagdish Patil

निवृत्ती बाबर -

मुंबई: शिल्लक सेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava) झाला. या मेळाव्यात तीन महिन्यापुर्वी राष्ट्रवादीतून (NCP) आयात केलेल्या कोणीतरी ताई ३० ते ३५ वर्ष शिवसेनेसाठी झटणाऱ्या शिवसैनिकांना निष्ठा शिकवतं होत्या, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी ठाकरे गटात नव्याने आलेल्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला.

कालच्या मेळाव्यातील भाषणामध्ये सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी, नारायण राणे, रामदास कदम, यांच्यासह शिंदे गटातील अनेक नेत्यांवर आपल्या शैलीत टीका केली. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांनी हिंदू धर्मातील कोणत्या ग्रंथात दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा हे सांगितले आहे ते सांगा, असं आवाहन त्यांनी दिलं होतं. अंधारे यांनी काल केलेल्या टीकेला प्रतिक्रिया देणार एक ट्विट शीतल म्हात्रे यांनी केलं आहे.

या ट्विटमध्ये त्या म्हणतायत, शिल्लक सेनेचा काल शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये कोणीतरी ताई भाषण करत होत्या, या ताईंना तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीतून आयात करून शिवसेनेत आणलं आहे. त्यांनी याअगोदर कधीही शिवसेनेचा (Shivsena) झेंडा देखील हातात पकडला नाही,कधी सेनेच्या मेळाव्यात किंवा आंदोलनात सहभागी झाल्या नसतील.

त्या ताई गेली ३० ते ३५ वर्ष स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून शिवसेनेच्या वाढीसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे या शिवसैनिकांवर टीका करत होत्या. हे त्यांना कसं काय जमतं बुवा देव जाणे, असं म्हणत शीतल म्हात्रे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT