पुणे पाणी जपून वापर! धरणात फक्त ३४ टक्केच पाणीसाठा शिल्लक 
मुंबई/पुणे

Pune Dam water level : पुणेकरांनी पाणी जपून वापरा! धरणात फक्त ३४ टक्के पाणी, पुण्यात टँकरने पाणी पुरवठा

Dam water level in Pune : पुण्यात धरणातील पाणीपातळी केवळ ३४% राहिल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उजनी धरणातही उपयुक्त पाणीसाठा ७ टीएमसीवर आला आहे. पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

Pune Dam water level News : राज्यात उन्हाचा तडाका वाढल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. पाण्याची मागणी सुद्धा वाढू लागली आहे. पुण्यातही आता सर्वाधिक पाण्याच्या टँकर पुरवले जात आहेत. आणखी दोन ते तीन महिने उन्हाळा आहे, त्यापूर्वीच पुण्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्याच्या घडीला राज्यातल्या तब्बल १४ जिल्ह्यात ७८४ गावे आणि वाड्यांची तहान टँकरच्या पाण्याने भागवण्याची वेळ आली आहे. राज्यात सध्या २२३ टँकरने पाण्याचा पुरवठा केला जातोय.. त्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा पुणे जिल्ह्यात केला जातोय. सध्या पुण्यात सर्वाधिक ६५ टँकर धावत आहेत. त्या खालोखाल साताऱ्यात 40 टँकरने गावागावात पाणीपुरवठा करीत आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ३४% पाणी असल्याची माहिती समोर आली आहे. जून २०२५ पर्यंत हा पाणीपुरवठा पुरेल अशी माहिती आणि पुरवठा अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. सध्या तरी पुण्यात कोणत्याही प्रकारचे पाणी कपात नाही. मात्र मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचं संकट पुणेकरांवर येऊ शकते. सध्या पुण्यात 65 टँकरने व्यवसायिक आणि लोकवस्ती भागात पाणीपुरवठा केला जात आहे. छोट्या टँकर भरण्यासाठी 599 तर मोठ्या टँकरला 1200 रुपये मोजावे लागत आहे.

पुण्यातही टँकरच्या मागणीत वाढ झाली

पर्वती जलाशतीकरण केंद्रावर आणि टँकरच्या रांगा लागल्या आहेत. सध्याच्या स्थितीत पुणे शहराला उद्याचा पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती अधिकारांकडून देण्यात येत आहे. पुणे शहरासह उपनगरात ही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. सोसायट्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागत असल्याने रोज तीन ते चार टँकर लागत आहेत. याचा खर्च दिवसाला पाच ते सहा हजार होत आहे. त्यामुळे पाणी जपून वापराव लागत आहे.

उजनीत केवळ १३ टक्के पाणीसाठा

पुणे , सोलापूर आणि आहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. ⁠उजनी धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय. उपयुक्त पाणीसाठा केवळ ७ टीएमसी एव्हढाच शिल्लक राहिलाय. ⁠तब्बल ६३ टीएमसी मृतपाणीसाठा शिल्लक आहे. ⁠आठवडाभरात उपयुक्त पाणीसाठा संपून उजनीत मृत पाणीसाठाच शिल्लक राहणार आहे. ⁠त्यामुळे ऐन उन्हाळ्यात परीसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे. ⁠सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम जाणीवपूर्वक खरवडण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डीच्या साई संस्थानला पुन्हा धमकीचा मेल...

Alcohol Price Hike: उत्पादन शुल्कात भरमसाठ वाढ, 'विदेशी' महागली, तळीरामांच्या देशीवर उड्या

Navi Mumbai: 'मराठी बोलता है' फैझानच्या टोळक्याकडून मराठी तरूणाला मारहाण; हॉकी स्टिकनं काळंनिळं होईपर्यंत मारलं

शाळेत भुत दिसल्याची अफवा; ५०० विद्यार्थी पळत सुटले;VIDEO

Instagram Game: कोणत्याही अ‍ॅपशिवाय इन्स्टाग्रामवर खेळा फ्रिमध्ये गेम, वापरा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT