Crime Branch and FDA officials seize adulterated milk packets during a raid in Dahisar East, Mumbai. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai: धक्कादायक! अमूल, गोकुळसारख्या ब्रँडेड पिशव्यांत विकलं जात होतं भेसळयुक्त दूध; FDA ची मोठी कारवाई

Dahisar Adulterated Milk Racket Busted: दहिसरमध्ये भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ४७० लिटर दूध जप्त, एक आरोपी अटकेत. मुंबई गुन्हे शाखा आणि एफडीएची संयुक्त कारवाई.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-१२ आणि अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांच्या संयुक्त कारवाईत दहिसर पूर्व परिसरात नामांकित दूध कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत ४७० लिटर भेसळयुक्त दूध, ३२७ रिकाम्या दूध पिशव्या, भेसळीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि एक मोबाईल फोन असा एकूण ३९,७५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेच्या कक्ष-१२ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी पहाटे दहिसर पूर्व येथील राजेश कंपाऊंडजवळील दुबे चाळ परिसरात छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपी नामांकित कंपन्यांच्या अमूल ताजा, अमूल गोल्ड आणि गोकुळ दूधाच्या मूळ पिशव्या कापून त्यातील काही प्रमाणात दूध बाहेर काढत होता. त्यानंतर त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळून स्टोव्ह पिन व मेणबत्तीच्या साहाय्याने त्या पिशव्या पुन्हा सील करून ते दूध मूळ कंपनीचे असल्याचा भास निर्माण करत ग्राहकांना विक्रीसाठी तयार केले जात असल्याचे उघड झाले.

कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले ४७० लिटर भेसळयुक्त दूध आरोग्यास अत्यंत घातक असल्याने ते जागीच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखेचे कक्ष-१२ करीत आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण-उत्तर) रविंद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे-पाटील, पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, पूजा खांडेकर, विजय रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, युवराज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक किरण कोते, अजय सावंत तसेच गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी आणि अन्न सुरक्षा अधिकारी तुषार पांडुरंग शेळके व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी दूध किंवा इतर अन्नपदार्थांबाबत संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलिस किंवा अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:रघुवीर घाटात भीषण भूस्खलन; महामार्गाची एक बाजू दरीत वाहून गेली, वाहतूक पूर्णपणे बंद

Khopoli Hill Station : पावसाळी पिकनिकसाठी परफेक्ट! खोपोलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन

Om Bhutkar wedding: मराठमोळ्या अभिनेत्याने गुपचुप उरकलं लग्न?; बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

e-challan : तुम्हाला चुकून ई-चालान आलंय, ऑनलाइन कॅन्सल करता येईल का आणि ते कसं ? वाचा सविस्तर

Shirdi Sai Baba : शिर्डीला दर्शन घ्यायला जाताय? VIP दर्शन महागलं, आता किती रूपयांना मिळणार पास?

SCROLL FOR NEXT