Avinash Jadhav  Saam tv
मुंबई/पुणे

Avinash Jadhav : अविनाश जाधवांनी पोलिसांसमोर सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला कानफटवलं, व्हिडिओ आला समोर

Avinash Jadhav beaten jewellers son : पोलिसांत गुन्हा नोंदविल्यानंतर अविनाश जाधव यांनी धमकावणे आणि मारहाणीचे आरोप फेटाळले. त्यानंतर आज अविनाश जाधव यांनी केलेल्या मारहाणीचा थेट सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मनसे नेते अविनाश जाधव यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अविनाश जाधव यांच्या विरोधात शुक्रवारी मुंबईमधील झवेरी बाजारातील सराफा व्यापाराच्या मुलाला धमकावणे आणि ५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांत गुन्हा नोंदविल्यानंतर अविनाश जाधव यांनी धमकावणे आणि मारहाणीचे आरोप फेटाळले. त्यानंतर आज अविनाश जाधव यांनी केलेल्या मारहाणीचा थेट सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पोलिसांसमोरच सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला मारहाण केली. अविनाश जाधव यांनी पोलिसांसमोरच मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेप्रकरणी अविनाश जाधव आणि त्यांच्या मित्राविरोधात लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिस ठाण्यात खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.

अविनाश जाधव यांच्यावर काय आरोप आहेत?

अविनाश जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशोबासाठी दादरच्या झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याने बोलावले होते. त्यावेळी अविनाश जाधव देखील सोबत होते. यावेळी काही वादानंतर अविनाश जाधव यांनी सराफाच्या मुलाला मारहाण केली. जाधव यांच्या विरोधात सराफा व्यापाऱ्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

जाधव यांनी उचलून नेण्याची धमकी दिली. तसेच नुकसान करण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप आहे. या प्रकरणी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी पोलिसांत तक्रार दिली. व्यापारी जैन यांनी पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केला.

जाधव यांनी धमकी दिल्याचा आरोप आहे. सराफा व्यापारी शैलेश जैन यांनी तक्रार केल्यानंतर जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SL : टीम इंडियाची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड; कुणाला मिळाली संधी? कुणाचा पत्ता कट?

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट आज दुपारी १२ ते २ पर्यंत बंद

भाजपचे भीष्म पितामह पंचतत्वात विलीन; राजकारणात शोककळा

Ratnagiri Fort : भव्य तलाव अन् किल्ल्याच्या आत ४०० वर्षे जुनी तोफ! रत्नागिरीतील 'या' ऐतिहासिक किल्ल्याचं गुपित माहितीये का?

Famous Director : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आईचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT