Dadar Shivaji Park Viral Video instagram
मुंबई/पुणे

Shivaji Park : शिवाजी पार्कमध्ये किळसवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी भडकले

Dadar Shivaji Park Viral Video : दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये एकजण दिवसाढवळ्या लघुशंका करत आहे. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Yash Shirke

  • दादरच्या शिवाजी पार्कमध्ये किळसवाणा प्रकार घडला.

  • भर दिवसा एकाने अश्लील-अस्वच्छ कृत्य केले.

  • व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले

Dadar Shivaji Park : मुंबईतील दादरमधून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये एक व्यक्ती अश्लील-अस्वच्छ कृत्य करत असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किळसवाणा प्रकारामुळे नागरिकांना संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एकजण दिवसाढवळ्या मैदानाच्या सीमेलगत असलेल्या जाळ्याच्या बाजूला लघुशंका करत असल्याचे पाहायला मिळते. या व्यक्तीच्या बाजूला एक तरुणी बेंचवर बसल्याचेही दिसते. असे असतानाही त्या व्यक्तीने अयोग्य-अस्वच्छ वर्तन केल्याचे व्हिडीओत दिसते. या घाणेरड्या प्रकारामुळे नेटकरी संतापले आहेत.

shivajipark_ या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'निर्लज्ज पणाचा कळस , कुठे काय करता ह्याच पण भान नाही', असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. नीरज माळपेकर या तरुणाने व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओच्या कमेंटबॉक्समध्ये कमेंट करत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

दादर पश्चिममधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मुंबईकरांचे आवडते ठिकाण आहे. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत अनेकजन या मैदानात फेरफटका मारत असतात. काहीजण व्यायाम करण्यासाठी, काहीजण विश्रांती घेण्यासाठी, तर काही फक्त फिरण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये येत असतात. या मैदानाला राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day 2025 : स्वातंत्र्याच्या ज्वालेतून पेटलेला प्रगतीचा मशाल...; १५ ऑगस्टसाठी खास प्रभावशाली भाषण, एकदा वाचाच

CBSC Students : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता पुस्तकं पाहून द्या परीक्षा

Maharashtra Politics : 'उद्धव ठाकरेंनाही निवडणूक जिंकण्यासाठी ऑफर; पवारांनंतर राऊतांनी फोडला नवा बॉम्ब, VIDEO

Pune : पाकिस्तानला चकवा देणाऱ्या ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर यांचे पुण्यात निधन

Makeup Tips: तुम्हालाही मेकअप कराता येत नाही? मग फॉलो करा या सोप्या स्टेप्स आणि करा ग्लॅमरस मेकअप

SCROLL FOR NEXT