मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबई विमानतळावर 5 किलो हेरॉईन जप्त, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

आरोपीकडून ४९७० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. ज्याची बाजारात किंमत अंदाजे ३४ कोटी ७९ लाख इतकी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अमली पदार्थांचा (Drugs) साठा जप्त करण्यात आला आहे. हेरॉईनची तस्करी करणाऱ्या एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून कस्टम अधिकाऱ्यांनी जवळपास ३५ कोटींची हेरॉईन जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीकडून ४९७० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. ज्याची बाजारात किंमत अंदाजे ३४ कोटी ७९ लाख इतकी आहे. आरोपीने हे ड्रग्स त्याच्या बॅगेत एक विशिष्ठ जागाकरून लपवले होते. (Mumbai News)

कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेतून त्यांची ही चालाखी चुकली नाही. या आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील चौकश तपास यंत्रणा करत आहेत.

दोन दिवसांपूर्वीही अशीच मोठी कारवाई तपास यंत्रणांनी केली होती. त्यावेळी जवळपास पाच कोटींची कोकेन जप्त करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार ४९० ग्रॅम कोकेन कस्टमच्या अधिकाऱ्यांची जप्त केले होते. याप्रकरणी केनियाची नागरिक असलेल्या महिलेला अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT