मुंबई/पुणे

मोठी बातमी! पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका इसमाने दोन दिवसांपूर्वी दिली होती.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुणे रेल्वे स्थानक (Pune railway station) बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका इसमाने दोन दिवसांपूर्वी दिली होती. सदर आरोपीने बॉम्बची धमकी देऊन पैशांची मागणी केली होती. त्यामुळे पुणे परिसरात एकच खळबळ माजली होती. मात्र, रेल्वे पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तातडीनं दखल घेवून पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी (bomb threat) देणाऱ्याला गजाआड केले आहे. प्रभू कृष्णा सूर्यवंशी (२२) असं (culprit arrested) अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी सूर्यवंशी हा नांदेड जिल्ह्यातील हदगावचा रहिवाशी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रभू कृष्णा सूर्यवंशीने दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. सूर्यवंशीने गूगल व्हॉईस सर्चवरुन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा नंबर शोधला होता. त्यानंतर त्याने पुणे पोलिसांना फोन करुन धमकी दिली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी सूर्यवंशीला अटक केली. यापूर्वीही सूर्यवंशीने राजकीय नेते आणि उद्योगपतींना धमकावले होते. आरोपी सूर्यवंशी विरोधात यापूर्वीही गावदेवी पोलीस ठाणे व वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT