pune, morcha at pune collector office
pune, morcha at pune collector office saam tv
मुंबई/पुणे

Pune News: दगडखाण कामगारांचा लेकराबाळांसह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर लाॅंग मार्च

Siddharth Latkar

Pune News : वाघोली येथील गायरान जमिनीवर पिढ्यान- पिढ्या राहत असल्याने या जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावावर व्हावा या प्रमुख मागणीसाठी सुमारे एक हजार दगडखाण कामगारांनी आज (बुधवार) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर लाॅंग मार्च काढला आहे. या मार्चमध्ये महिला व पुरुष दगडखाण कामगार आपल्या लहान मुलाबाळांसह सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

वाघोलीतील (wagholi) गायरान जमिनीवर मागील कित्येक वर्षांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय दगडखाण कामगार राहत आहेत. गायरान जमिनीवर राहणाऱ्या दगडखाण कामगारांना त्यांची हक्काची जमीन मिळावी यासाठी दगड खान असंघटित कामगार विकास परिषद सन 2000 पासून शासन दरबारी मागणी करत आहे.

17 एप्रिल 2015 ला पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वाघोली येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र अजूनही गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमित झाले नसल्याने आज हा लॉन्ग मार्च काढला आहे अशी माहिती वकील बी.एस.रेगे (अध्यक्ष, दगडखाण असंघटित कामगार विकास परिषद) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Fake Currency | यूट्यूबवर प्रशिक्षण घेऊन घरातच बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक

Special Report | मुंबईत नोकरी, मात्र मराठी माणसाला 'नो एन्ट्री', गुजराती कंपनीचा मराठी विरोधी फतवा?

Nashim Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेत्यांना यश.. ९ दिवसांनंतर राजीनामा मागे

Special Report : Kolhapur Lok Sabha | कोल्हापूरचा आखाडा कोण जिंकणार?

OTT Release Date: थ्रिलर अन् ॲक्शनपटाची यंदाच्या आठवड्यात प्रेक्षकांना मेजवानी, जाणून घ्या चित्रपट, वेबसीरीजची यादी

SCROLL FOR NEXT