Criminal Attacks Pune Police Station Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime: 'तुझा मर्डर करेन' पोलिसांवर मिरची स्प्रे, काचाही फोडल्या; पोलीस ठाण्यात चोरट्याचा राडा

Criminal Attacks Pune Police Station: सहकारनगर पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार बारक्या लोंढेने मिरची स्प्रे फवारून राडा घातला. पोलिसांना धमकी दिली. काही पोलिस जखमी. नागरिकांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Bhagyashree Kamble

पुण्यात गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच सहकारनगर पोलीस ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका सराईत गुन्हेगाराने पोलीस ठाण्यात तोडफोड करत चांगलाच राडा घातलाय. मुख्य म्हणजे त्यानं पोलिसांच्या तोडांवर मिर्ची स्प्रे मारला आणि पोलिसांना धमकी दिली. चोरट्याच्या या हल्ल्यात काही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

बारक्या लोंढे असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्यानं रात्री सहकारनगर पोलीस ठाण्यात राडा घातला होता. चोरट्यानं काही पोलिसांच्या तोंडावर मिरची स्प्रे मारला. यामुळे काही पोलीस जखमी झाले आहेत. यावेळी चोरट्याने पोलिस ठाण्यात तोडफोड करत काचा फोडल्या आणि स्वतःलाही मारून घेतलं.

यावेळी त्यानं काही पोलिसांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. 'घरात घुसून मर्डर' अशी धमकी त्यानं पोलिसांना दिली. हा राडा रात्रभर पोलीस ठाण्यात सुरू होता. या हल्ल्यात चार ते पाच पोलिसांना श्वसनाचा त्रास झाला असून, सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी दिली आहे.

पुणेकर संतप्त

या घटनेनंतर पुणेकरांनी असुरक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'पुणेकर सुरक्षित नाही. पोलीस स्टेशनमध्ये न्याय मागायला येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळत नाहीत. पोलीस आयुक्तही पुणेकरांनी न्याय कोणाकडे मागायचे? असा प्रश्न पुणेकरांना पडलाय.आरोपीला मोकाट आहेत. ते खुलेआम पोलीस स्टेशन फोडतात. जीवघेणा हल्ला करतात. तरीही काही पोलीस आरोपींना मदत करतात, असा आरोप एका नागरिकाने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT