Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : पत्नी बाहेर जाताच पतीची नियत फिरली, मेहुणीच्या २० वर्षीय मुलीवर बलात्कार; मुंबईतील घटना

Mumbai Crime News : मावशीच्या घरी आलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर काकानेच लैंगिक अत्याचार केला. ही संतापजनक घटना मुंबईतील एका परिसरात घडली.

Satish Daud

मावशीच्या घरी आलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर काकानेच लैंगिक अत्याचार केला. ही संतापजनक घटना मुंबईतील एका परिसरात घडली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी मुंबईतील (Mumbai News) एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. पीडितेची मावशी आणि आरोपी काका मुंबईतच राहतो. १५ जून रोजी ड्यूटी संपल्यानंतर पीडित तरुणी मावशीला भेटायला तिच्या घरी गेली. यावेळी आरोपी काका देखील घरातच होता.

दरम्यान, पीडितेची मावशी काही कामानिमित्त बाहेर गेली. तेव्हा आरोपी काकाने पीडितेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला पीडित तरुणीने विरोध केला. त्यावेळी आरोपीने किचनमधून चाकू आणला. याच चाकूचा धाक दाखवून त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार (Crime News) केला.

अत्याचारानंतर आरोपीने पीडित तरुणीचे व्हिडीओ देखील काढले. याबाबत कुणालाही सांगितल्यास समाजमाध्यमांवर व्हिडीओ टाकून तुझी बदनामी करेल, अशी धमकी देखील आरोपीने तरुणीला दिली. या संपूर्ण प्रकारानंतर पीडिता मानसिक तणावात गेली. सुरुवातीला याबाबत कुणालाही सांगितले नाही.

मात्र, आरोपी काकाकडून पुन्हा शरीरसंबंधांची मागणी होत असल्याने पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं कळताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली तिने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पीडित तरुणीची राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sprouted Potatoes: मोड आलेले बटाटे खायचे की नाही? आरोग्यावर काय होतो परिणाम, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शिवा शर्मा हत्याकांडातील आरोपी श्रद्धा दुबेसह तिघांना न्यायालयात हजर करणार

Shocking : धक्कादायक! पोलिसाने राहत्या घरात आयुष्य संपवलं; अमरावतीत खळबळ

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

SCROLL FOR NEXT