Nalasopara News  saam tv
मुंबई/पुणे

Crime News: पतीनेच केली पत्नीची निर्घुण हत्या, धक्कादायक घटनेने नालासोपाऱ्यात खळबळ

धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा पती पती हितेशने मेघाच्या आईला तुझ्या मुलीला मी संपवले असा मजकुर असलेला मेसेज केला होता.

Gangappa Pujari

चेतन इंगळे

Mumbai: नालासोपाऱ्यात पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालासोपाऱ्यात तुळींज जिल्हा परिषद शाळेजवळ सीता सदनमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून महिलेच्या पतीनेच केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Nalasopara)

याबाबत अधिक माहिती अशी की, नालासोपारा येथील तुळींज जिल्हा परिषद शाळेजवळ सीता सदनमधील दुसऱ्या मजल्यावरील रूम मध्ये राहणाऱ्या मेघा शहा (वय, 45) यांची हत्या झाल्याची घटना घडली. याबद्दलची माहिती नागरिकांनी तुळींज पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच तुळींज पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस पंचनामा सुरु आहे.

धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा पती पती हितेशने मेघाच्या आईला तुझ्या मुलीला मी संपवले असा मजकुर असलेला मेसेज केला होता.

हा मेसेज आल्यानंतर मृत महिलेच्या आईने खात्री करण्यासाठी घराच्या एजंटला फोन करून चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. मात्र हि हत्या त्याने नेमकी का केली याबद्दलचे कारण अद्याप समोर आले नसून घटनेचा पुढील तपास नालासोपारा तुळींज पोलीस करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT