Crime News In Pune Saam TV
मुंबई/पुणे

Crime News In Pune : फेमस होण्यासाठी शालेय विद्यार्थिनींचा भर चौकात राडा; साउथ चित्रपटांनाही लाजवेल असा मारहाणीचा VIDEO VIRAL

घटनेचा एक फिल्मी स्टाईल व्हिडिओ देखील रोकॉर्ड करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : मुलींच्या भांडणाचे राड्याचे अनेक व्हिडिओ आजवर तुम्ही पाहिले असतील. अशात साउथ चित्रपटांनाही लाजवेल असा मुलींच्या हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शाळकरी मुलींच्या एका टोळक्याने एकत्र येत एका मुलीला जबर मारहाण केली आहे. या घटनेचा एक फिल्मी स्टाईल व्हिडिओ देखील रोकॉर्ड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.(Crime News)

चित्रपटातला वाटेल अशा पध्दतीने भर चौकात शाळकरी मुलींनी एका मुलीवर हल्ला चढवलाय. तसेच त्या मुलीच्या केसांना धरुन तिला ओढत मारहाण केली आहे. प्रसिद्ध होण्यासाठी या घटनेचे चित्रिकरण करून समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. "राडा....कंपनी...गँगस्टर.. विषय करायचा नाय ताई" असे व्हिडिओला कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

दिव्यांग मुलीला मारहाण

ज्या मुलीला मारहाण करण्यात आली ती मुलगी दिव्यांग होती. भेदरलेल्या अवस्थेत घरी आलेल्या मुलीला पाहून आई वडिलांना धक्का बसला. या मुलींनी आपली टोळी बनवली होती. एकत्रितपणे विविध ठिकाणांना भेटी देणे, वाढदिवस साजरे करणे, रील्स बनवणे, समाजमाध्यमावर फॉलोअर्स वाढवणे हे या मुलींच नेहमीचं काम झालं होतं.

का केली मारहाण?

गैरसमज झाल्याने या दिव्यांग मुलीला मारहाण केल्याचे मुलींच्या टोळक्याने सांगितले आहे. व्हिडिओ शेयर करून आपली इमेज बनवणे हा त्यांच्या मनातील हेतू होता हे उघड झाले आहे.पोलिसांनी या मुलींचे समुपदेशन करून या मुलींना सोडून दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT