Husband Killed Wife in Virar Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Virar Crime : पती नव्हे हा तर हैवान! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य

प्रियंका उर्फ पिंकी पाटील (वय २५ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Virar Crime News : संसाराचा गाडा हाकताना पत्नी-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, तर काही वेळा वाद विकोपाला गेल्याने गंभीर गुन्हे घडतात. अशीच एक घटना विरारमधून उघडकीस आली आहे. येथे एका पतीने जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीची हत्या केली आहे. शवविच्छेदन अहवालावरून हत्येचा उलगडा झाला आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा (Crime News) दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. प्रियंका उर्फ पिंकी पाटील (वय २५ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. विरारच्या शंकरपाडा परिसरात राहणाऱ्या प्रियांका हिचा मृतदेह पोलिसांना राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. (Tajya Batmya)

प्रियंकाचा पती घरातून गायब असल्याने तसेच त्याचा मोबाईल बंद येत असल्याने पोलिसांना (Police) प्रियांका हिची हत्या झाली असावी, असा संशय होता. दरम्यान, पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी प्रियंकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात पाठवला.

आज शवविच्छेदनाचा अहवाल आला असून प्रियंका हिची गळा चिरून हत्या झाल्याचं उघड झालं. दरम्यान, पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करत आहे. तर फरार आरोपी पतीचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी आरोपी पतीचा शोध घेत असताना व्हाट्सअपच्या स्टेट्सवर त्याने आई वडील मला माफ करा, मी काही वेगळे काम करणार आहे असा मॅसेज ठेवला होता. तसेच तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असल्याची उपयुक्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT