Dombivli Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli Crime News: डोंबिवलीत खुलेआम तरुणाची 'हुक्का पार्टी', व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत खुलेआम तरुणाची 'हुक्का पार्टी', व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

साम टिव्ही ब्युरो

Dombivli Crime News: सुसंस्कृत व सुशिक्षित अशी ख्याती असलेल्या डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याचे दिसून येतेय. डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात एक तरुण भर रस्त्यात हुक्का पित असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चा हा व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, या घटना स्थळापासून काही मिनटावर डोंबिवली पोलीस ठाणे, एसीपी कार्यलय आहे.

तसेच हा प्रकार सुरु होता तिथून थोड्याच अंतरावर डोंबिवली रेल्वे स्थानक आहे. रात्रीच्या सुमारास स्टेशन परिसरात पोलिसांची गस्त सुरू असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातो.  (Latest Marathi News)

हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांचा हा दावा फोल ठरल्याचे दिसून येतेय. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता देखील ऐरणीवर आलीये. व्हिडीयो व्हायरल होताच पोलिसांनी तपास सुरू करत व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या एका तरुणाला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

तसेच उर्वरित दोन तरुणांची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अक्षय पवार असं अटक करण्यात आलेला तरुणाचे नाव आहे. हुक्का पिणारा सुरज साळुंखे व त्याचा मित्र पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT