Crime News,  saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: नातीसमोरच सासऱ्याने सुनेला क्रूरपणे संपवलं; अनैतिक संबंधांना विरोध केल्याने हत्या

Father in law killed Daughter in law: दिनकर कोळी असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे.

रोहिदास गाडगे

Pune News : सासऱ्याने नातीसमोरच सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाफगाव येथे ही घटना घडली आहे. अनैतिक प्रेम संबंधाना सुनेचा विरोध असल्याने सासऱ्यांना तिचा अशा पद्धतीने काटा काढला आहे.

दिनकर कोळी असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे. दिनकर कोळी याचे एक महिलेशी अनैतिक प्रेम संबध होते. या प्रेम संबधांना सुनेने वारंवार विरोध केला होता. मात्र सुनेचा विरोध सासऱ्याला मान्य नव्हता. (Crime News)

दरम्यान याच रागातून सासरा दिनकर कोळी याने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत सुनेची हत्या केली. आपल्या चिमुकल्या नातीच्या समोरच सून मेघा कोळी हिच्या तोंडात बोळा कोंबून गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी दिनकर कोळी याच्यावर राजगुरुनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारित्र्यावर संशय घेत पतीने चाकूने चिरला पत्नीचा गळा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. आरती रणजीत झा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी पती रणजीत उर्फ विकास झा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती मूळचा बिहारचा रहिवासी आहे. तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. तर आरती झा एका सोन्याच्या दुकानात कर्मचारी म्हणून काम करत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

Konkan Beaches : ऑक्टोबरच्या कडक उन्हात थंडगार समुद्रकिनाऱ्याची सफर! पाहा कोकणच्या कुशीत लपलेले 'हे' ७ सुंदर किनारे

Maharashtra News Live Update: धुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे तलावात उतरून आंदोलन

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

SCROLL FOR NEXT