Kalyan Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Crime News :रात्री कामावरून परतणाऱ्या तरुणीची छेडछाड करून मारहाण; मदतीसाठी धावलेल्या तरुणांवरही जीवघेणा हल्ला

Kalyan Crime : कामावरुन घरी परतणाऱ्या तरुणीची एका तरुणाने भर रस्त्यात छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.

Chandrakant Jagtap

>> अभिजीत देशमुख

Kalyan Crime News : कामावरुन घरी परतणाऱ्या तरुणीची एका तरुणाने भर रस्त्यात छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. एवढंच नाही तर तरुणीच्या मदतीला धावलेल्या दोन तरुणांना देखील बेदम मारहाण केल्याची घटना मंगेशी पॅराडाईज परिसरात घडली आहे.

तरुणीच्या मदतीला धावलेल्या योगेश चौधरी आणि उत्कर्ष सिंग या दोन तरुणांवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी प्रवण कोनकर नवाच्या तरुणासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात मारहाण करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. दर्शन कोनकर, हेमंत राजा कोट, सनी मालवी, अमन जयस्वाल अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेत राहणारी 22 वर्षीय तरुणी रात्री कामावरुन घरी परतत असताना प्रणव कोनकर याने तिला भर रस्त्यात अडवले आणि तिची छेड काढली. यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर योगेश आणि उत्कर्ष हे दोन तरुण तिच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला.

परंतु प्रणव कोनकरने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले आणि त्या सर्वांनी मिळून योगश चौधरी आणि उत्कर्ष सिंग या दोघांना लाकडी काठीने आणि बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीत योगेशचं डोकं फुटलं, तर उत्कर्षच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या दोघांना रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (crime news)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

SCROLL FOR NEXT