Cricket Fight  Saam tv
मुंबई/पुणे

Cricket Fight : श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट टुर्नामेंटमध्ये तुफान राडा; 2 संघामध्ये तुंबळ हाणामारी,VIDEO

Cricket Fight viral video : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट टुर्नामेंटमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली. २ क्रिकेट संघाच्या वादानंतर तुंबळ हाणामारी झाली.

विकास काटे, ठाणे

राज्य असो किंवा देशात राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये शेकडो खेळाडू हजेरी लावतात. क्रिकेट म्हटलं तर सकाळपासूनच खेळाडूंसहित प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. अशाच प्रकारच्या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन कल्याणमध्येही करण्यात आलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. त्यापैकी ठाण्यातील कोपरी परिसरातील तुकाराम मैदानात शिवसेनेच्या वतीने युवासेना चषक 2025 चं आयोजन करण्यात आलं होतं. काल तुकाराम मैदानात दोन संघांमध्ये किरकोळ कारणास्तव तुफान हाणामारी झाली.

दोन्ही संघाचा वाद मिटवण्यासाठी युवासेनेचे आयोजक सिद्धेश अभंगे गेले असता त्यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. दोन्ही संघाच्या विरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

ठाण्यातील कोपरीतील तुकाराम मैदानात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या सामन्यादरम्यान दोन क्रिकेट संघामध्ये वाद झाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना मारहाण केली. या वादात इतर प्रेक्षकांनीही उडी घेतल्याचं दिसत आहे. काही जण हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दोन्ही संघातील खेळाडू कोणाचंही न ऐकता हाणामारी करताना दिसत आहे. क्रिकेट खेळाडूंच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

स्पर्धेचे आयोजकही खेळाडूंना वाद थांबवण्याची विनंती करत आहे. मात्र, त्यांचंही कोणीही ऐकताना दिसत नाही. दोन्ही संघातील वादानंतर मैदानात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. खेळाडूंनी बॅट, स्टम्पने एकमेकांना मारहाण केल्याचं बोललं जात आहे. या हाणामारीत किती खेळाडू जखमी झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच या प्रकारानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT