एसटी विलीनीकरणावर आज कोर्टात सुनावणी  Saam Tv
मुंबई/पुणे

एसटी विलीनीकरणावर आज कोर्टात सुनावणी

समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांनी ३ नोव्हेंबर रोजी पुकारलेला संप अद्याप देखील सुरूच आहे. एसटीच्या विलीनीकरणावर राज्य शासनाला समिती गठीत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने (High Court) देऊन प्राथमिक अहवाल 20 डिसेंबर रोजी मागितला होता. कोर्टाने नेमलेली समिती आज कोर्टात प्रार्थमिक अहवाल सादर करणार आहे.आज (20 डिसेंबर) उच्च न्यायालयात संपाबद्दल असलेल्या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

हे देखील पहा -

एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप 20 डिसेंबर पर्यंत असाच ठेवावा तसेच विलीनीकरण पक्के असल्याचा दावा वेळोवेळी करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या सुनावणीतून आज एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरणाचाच निर्णय होणार, अशाप्रकारच्या पोस्ट संपकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समाज माध्यमांच्या ग्रुपवर व्हायरल होत आहेत.

एसटी महामंडळाने हा संप मोडून काढण्यासाठी अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, सेवासमाप्ती, बडतर्फीची कारवाई केली. तर वेतनवाढही दिली. इतेच नाही तर मेस्मा लावण्याचा इशाराही दिला. तरी देखील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. दरम्यान, विलीनीकरणाच्या प्रश्नावर न्यायालयाने एक समिती नेमली आहे. त्याला १२ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. या समितीला आज प्राथमिक अहवाल मागितला आहे. त्यामुळे २० डिसेंबरला विलीनीकरणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याकडेच कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT