Mumbai-Pune Corporation Election SaamTv
मुंबई/पुणे

Corporation Election: पालिका निवडणुकीत लाडक्या बहिणींची लागणार लॉटरी, मुंबईत ८७९ तर पुण्यात ३५० महिला रिंगणात

Mumbai-Pune Corporation Election: मुंबई आणि पुणे या दोन महानगर पालिका निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने उतरले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना उमेदवारी दिली आहे.

Priya More

Summary -

  • महापालिका निवडणुकीत लाडक्या बहिणींना संधी

  • मुंबईत ८७९ तर पुण्यात ३५० महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

  • खुल्या आणि आरक्षित वॉर्डमध्येही महिलांना उमेदवारी

  • यंदा महापालिकांमध्ये महिलाराज पाहायला मिळण्याची शक्यता

राज्यात सध्या महानगर पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तब्बल ८ ते १० वर्षांनंतर या निवडणुका होत असल्यामुळे अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचसोबत सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीमध्ये यंदा लाडक्या बहिणींना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी अनेक लाडक्या बहिणींना उमेदवारी दिली आहे. आता फक्त आरक्षित वॉर्डमध्येच नाही तर खुल्या वॉर्डमध्ये देखील लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. मुंबईत ८७९ तर पुण्यात ३५० महिला रिंगणात उतरल्या आहेत.

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना संधी दिली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आणि मनसे या पक्षांनी अनेक महिला उमेदवारांना संधी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण १७०० उमेदवार उतरले आहेत.

यामध्ये ८७९ म्हणजे ५१.७० टक्के महिला उमेदवार आहेत. यामधील ४१८ महिला मुख्य लढतीत आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या २२७ वॉर्डसाठी निवडणुकीचा सामना रंगणार आहे. या २२७ वॉर्डपैकी ११४ वॉर्ड महिलांसाठी आरक्षित आहेत. अशात महिला उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे मुंबईत यावेळी महिलाराज असणार आहे.

तर दुसरीकडे, पुणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये तब्बल ३५० लाडक्या बहिणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून या महिलांना संधी देण्यात आली आहे. या महिला उमेदवारांकडून दणक्यात प्रचार देखील सुरू आहे.

पुण्यात सर्वाधिक महिला उमेदवारांना भाजपमधून संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील आपल्या प्रभागामध्ये नेतृत्व करण्याची संधी महिलांना दिली आहे. त्यामुळे यावेळी पुणे महापालिकेत महिला राज पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT