'या' अस्थी कोणाच्या? भाईंदरच्या स्मशानभूमीत शेकडो अस्थी धूळ खात Saam TV
मुंबई/पुणे

'या' अस्थी कोणाच्या? भाईंदरच्या स्मशानभूमीत शेकडो अस्थी धूळ खात

भाईंदर पश्चिमेकडील भोला नगर संकुलातील स्मशानभूमीत कोरोनाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या अनेकांच्या अस्थी त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रतीक्षेत स्मशानभूमीच्या दारात पडून आहेत.

चेतन इंगळे

भाईंदर पश्चिमेकडील भोला नगर संकुलातील स्मशानभूमीत कोरोनाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या अनेकांच्या अस्थी त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रतीक्षेत स्मशानभूमीच्या दारात पडून आहेत. कोरोनाच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने मृतांचे कुटुंबीय आपल्या नातेवाईकांचा अस्थिकलश घेत नसल्याचे दिसून आले आहे. कोरोना मुळे अनेकांचा मृत्यु झाला, अनेकांचे संपूर्ण घर उध्वस्त झाले. परंतु मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अस्थी भाईंदर च्या स्मशानभूमीत कपाटत पडून आहेत. हिंदू मान्यते अनुसार अस्थी विसर्जन नंतर मृत व्यक्ती ला मुक्ती मिळते, परंतु मीरा भाईंदर मध्ये शेकडो अस्थीकलश आपल्या प्रियजनांच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिका प्रशासन कडून अस्थीकलाश असलेल्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मीरा भाईंदर शहरात कोरोना ने मृत्यूच्या संख्येत वाढ झाली होती. लोकांमध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले होते. अश्यावेळी मृत झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना मज्जाव करण्यात आला होता, त्यामुळे त्यांच्या अस्थी आजही विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT