Corona Virus India  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Corona Virus : पुण्यातील मुळशीत कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटचा शिरकाव, एक रुग्ण आढळल्याने खळबळ

Mulshi Corona News Variant : मुळशी तालुका आरोग्य विभागाकडून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

दिलीप कांबळे

Pune News :

राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट JN.1 चा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. शहरांसह राज्यातील गावांतही कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची रुग्ण आढळू लागले आहे. पुण्यातील मुळशी येथेही नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यांने खळबळ उडाली आहे.

रुग्णाला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र मुळशी तालुका आरोग्य विभागाकडून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सोमवारी 10 जानेवारीला राज्यात 98 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर 138 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहे. सोमवारी राज्यात एकूण 13644 कोविड टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 2355 या आरटीपीसीआर टेस्ट होत्या तर 11289 या आरएटी टेस्ट होत्या. राज्यात सध्या कोरोनाचे 891 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

पुण्यात सर्वाधिक रुग्ण

राज्यातील JN.1 या व्हेरिएंटची सर्वाधिक रुग्ण पुण्यातच आहेत. पुण्यात एकूण 150 बाधित रुग्ण आहेत. त्यानंतर नागपुरात 30 रुग्ण, मुंबईत 22, सोलापुरात 9, ठाण्यात 7, जळगावमध्ये 4, अहमदनगरमध्ये 3, बीडमध्ये 3, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2, कोल्हापूर येथे 2, नांदेडमध्ये 2, नाशिकमध्ये 2, धाराशिवमध्ये 2, अकोला, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, यवतमाळ येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT