Corona Virus In Maharashtra
Corona Virus In Maharashtra Saam TV
मुंबई/पुणे

Corona Virus In Maharashtra: कोरोनाची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; आरोग्यमंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

साम टिव्ही ब्युरो

Corona Virus In Maharashtra: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. चिंताजनक बाब म्हणजे मृतांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज तातडीने टास्क फोर्सच्या सदस्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. (Latest Marathi News)

मुंबई, पुणे तसेच ठाण्यासह १० अतिजोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना सावंत यांनी बैठकीत दिल्या आहेत. या बैठकीला पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक तथा टास्क फोर्सचे सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते. (Breaking Marathi News)

याशिवाय टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, सदस्य लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. हर्षद ठाकूर, आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक सुद्धा सहभागी झाले होते.

राज्यात कोरोनाचे ८५० नवे रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा संसर्ग (Corona Virus) वाढत असून गेल्या २४ तासांतील ताजी आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ८५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे ६४८ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्याचा राज्याचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट हा ९८.१० टक्के इतका आहे. तर मृत्यूदर हा १.८१ टक्के इतका आहे. आजच्या दिवशी १६,४१२ नमुन्यांची चाचणी झाली. त्यांपैकी १३,४४५ नमुन्यांची सरकारी प्रयोगशाळेत चाचणी झाली तर उर्वरित २७९९ चाचण्या खासगी प्रयोगशाळेत करण्यात आली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News: पुण्यात सिनेस्टाईल थरार; दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT