अजित पवारांना Corona सदृश्य लक्षणं, घरातील स्टाफला कोरोना संसर्ग; शरद पवारांची माहिती (Video) Saam Tv
मुंबई/पुणे

अजित पवारांना Corona सदृश्य लक्षणं, घरातील स्टाफला कोरोना संसर्ग; शरद पवारांची माहिती (Video)

दरवर्षी प्रमाणे बारामतीमध्ये पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. मात्र या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित असल्याने चर्चा होऊ लागली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: दरवर्षी प्रमाणे बारामतीमध्ये Baramati पवार कुटुंबियांना Pawar Family दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आज झालेल्या दिवाळी भेट कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी झुंबड झाली होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar या कार्यक्रमास अनुपस्थित असल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत येणारे वर्ष सुखसमृद्धीचे जावो अशा सदिच्छा दिल्या. या नंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मात्र या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित असल्याने चर्चा होऊ लागली.

व्हिडीओ-

आजच्या कार्यक्रमास अजित पवार मात्र उपस्थित नव्हते. त्यामुळे ते का आले नाहीत, याची चर्चा होऊ लागली. मात्र शरद पवारांनी पत्रकार परिषदमध्ये बोलत असताना अजित पवारांच्या आजच्या अनुपस्थितीचं कारण दिलं आहे. शरद पवार म्हणाले, अजित पवारांच्या स्टाफ मधील काही लोक कोरोना बाधित आढळले आहेत. अजित पवार यांनी टेस्ट केली असून रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे अजित पवार आजच्या कार्यक्रमाला गैरहजर होते, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

तसंच अजित पवारांना कोरोना सदृश्य लक्षण जाणवत असल्याची माहिती यावेळी पवारांनी दिली. त्यामुळे जास्त रिस्क नको म्हणून येऊ नका असं अजित दादांना सुचवलं. असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

शरद पवारांनी सांगितल्यानुसार, अजित पवारांच्या घरातील ३ कर्मचारी कोरोना बाधित तर २ ड्रायव्हर यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांशी संबंधितांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. त्याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अरे काही तरी चांगलं बोला, असं म्हणून शरद पवार यांनी हा विषय टाळला.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon : मालेगावात पुन्हा शिक्षक भरती घोटाळा; २ कोटी ६९ लाखात फसवणूक केल्याचे उघड, पाच जणांवर गुन्हा दाखल

Khodala Waterfall: मुंबईपासून जवळ असलेल्या धबधब्यावर भिजायचा प्लान करताय? 'हा' स्पॉट ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन

मला xxx काढता का? तुमचा माज...; अजित दादांच्या आमदाराची जीभ घसरली, नेमकं घडलं काय?

Maharashtra Politics: ...यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, CM फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी

Prajakta Mali: 'एक नंबर तुझी कंबर...' प्राजक्ताच्या फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा

SCROLL FOR NEXT