कोरोना रुग्ण वाढीचा धसका, राज्यात पुन्हा लाॅकडाऊन येणार? उद्याच कळेल.. Saam Tv
मुंबई/पुणे

Lockdown Update | कोरोना रुग्ण वाढीचा धसका, राज्यात पुन्हा लाॅकडाऊन येणार? उद्याच कळेल..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : देशात तसेच राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होत आहे. दिवसेंदिवस नव्या कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. तसेच, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचाही धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू होणार असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा उद्या शुक्रवार (31 डिसेंबर) होण्याची शक्यता आहे. (Corona patients increases in Maharashtra Govt might be imposed lockdown in state)

राज्यात कडक निर्बंध (Restrictions) लागू झाल्यास खालील नियम पाळावे लागतील -

🔴 राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांंवर कडक निर्बंध राहातील.

🔵 लग्न समारंभ, अंत्यसंस्कार यावर संख्येचे निर्बंध असतील.

🔴 लग्न समारंभात 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल.

🔵 अंत्यसंस्काराला 20 जणांना उपस्थित रहायला परवानगी असेल.

🔴 हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, सिनेमागृह बंद होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

आज रात्री उशिरा याबाबतचे अधिकृत आदेश जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, स्थानिक प्रशासनाला याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागतंय की नाही याबाबत उद्याच कळू शकणार आहे.

आज राज्यात किती रुग्ण वाढले?

महाराष्ट्रात आज दिवसभरात 5,368 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या आकड्याच कालच्या संख्येपेक्षा 1,468 ने वाढ झाली आहे, तर दिवसभरात 1,193 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 22 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 18,217 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आज कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिरक्रॉनचे (Omicron) 198 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 450 वर पोहोचली आहे, ही एक चिंतेची बाब आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्सची (Covid19 task force) बैठक पार पडली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू होणार असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. तर अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईत कलम 144 लागू करण्यात आला. त्यानंतर आता संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू होऊ शकतात.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT