Corona Variant JN.1 Cases Saam Digital
मुंबई/पुणे

JN.1 Covid Cases: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं; ठाण्यात एकाच दिवशी ५ रुग्ण; राज्यभरात ९ रुग्णांची नोंद

JN.1 Covid Cases in Maharashtra: कोरोनाच्या जेएन.१ या नव्या विषाणूने राज्यात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यात रविवारी जेएन.१ व्हायरसचे ५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Satish Daud

JN.1 Covid Cases in Maharashtra

कोरोनाच्या जेएन.१ या नव्या विषाणूने राज्यात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यात रविवारी जेएन.१ व्हायरसचे ५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एक महिलेसह ४ पुरुषांचा समावेश आहे. एकाचवेळी शहरात ५ नवे रुग्ण आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शहरातील कोरोना तपासण्या वाढवण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात राज्यात जेएन.१ विषाणूचे तब्बल ९ रुग्ण आढळून आले आहेत. (Latest Marathi News)

नव्या बाधित रुग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत ५, पुणे महापालिका हद्दीत ०२, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी १ रुग्णाची नोंद झाली. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी ८ आठ रुग्णांनी कोविडच्या लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

सध्या या सर्व रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सगळ्यांमध्ये जेएन १ व्हेरिएंटचे तीव्र लक्षणं नसून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृतीत देखील सुधारणा होत असल्याचं राज्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे देशात कोरोनाच्या नवीन जेएन.१ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात हा व्हेरिएंट कोकणात दाखल झाला. आता कोकणानंतर ठाणे आणि पुणे शहरात कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचे रुग्ण मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT