Mumbai Crime Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : रेफ्यूजी एरिया वापरण्यावरुन वाद पेटला; नातेवाईकानेच तरुणाचा जीव घेतला

रेफ्युजी एरिया वापरण्यावरून रफिक इकबाल सय्यद (३६) इलेक्रीशियन आणि त्याचा नातेवाईक असलेल्या इम्रान नावीर अहमद कुरेशी (२४) या दोघांमध्ये वादावादी झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे -

मुंबई : इमारतीतीमधील रेफ्युजी एरिया (Refugee Area) वापरण्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्य वादात मुंबईतील (Mumbai) मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कायक घटना समोर आली आहे. गुडियापाडा साईराज एसआरए इमारतीतीमध्ये ही घटना घडली आहे.

रेफ्युजी एरिया वापरण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका 36 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी (Malad Police Station) याप्रकरणी 24 वर्षीय तरुणास अटक केली आहे.

पाहा व्हिडीओ -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साधारणपणे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मालाड पोलीस ठाण्याच्या (Police) हद्दीतील साईराज एसआरए इमारतीतील रेफ्युजी एरिया वापरण्यावरून रफिक इकबाल सय्यद (३६) इलेक्रीशियन आणि त्याचा नातेवाईक असलेल्या इम्रान नावीर अहमद कुरेशी (२४) या दोघांमध्ये वादावादी झाली.

या वादात इम्रान कुरेशी याने आपल्या जवळील चाकूने रफिक सय्यद याच्या डाव्या खांदयावर, मानेजवळ व शरीरावर जोरदार वार करत हत्या केली. यासंदर्भात मयत रफिक सय्यद याच्या नातेवाईकांनी इमरान नाबिर अहमद कुरेशी या आरोपीविरोधात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली.

त्यानंतर मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र आढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जाधव तसेच पोलीस निरीक्षक बागल यांनी पुण्यातील आरोपी इमरान नाबिर अहमद कुरेशी याला तात्काळ अटक केली असून मालाड पोलीस ठाणे पुढील चा अधिक तपास करत आहे.

रेफ्यूजी एरिया म्हणजे काय ?

रेफ्युजी एरिया म्हणजे इमारतीमध्ये शॉर्टसर्किट, आग लागल्यामुळे नागरिकांची धावपळ होते तसेच आगीच्या धुरात गुदमरून जीव जाण्याची शकता असते तसेच काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. अशावेळी इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित थांबण्याची जी जागा सोडलेली असते त्या जागेला रेफ्युज एरिया म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calorie Burning Workouts: वजन घटवण्यासाठी किती वेगाने चाललं पाहिजे? जाणून घ्या कॅलरी लॉसचं संपूर्ण गणित

Plane Crash: एअरपोर्टवर अपघाताचा थरार! लँडिंगनंतर विमानाची दुसऱ्या विमानाला धडक; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Classical Singer Death: दसऱ्याच्या दिवशी संगीतविश्वात शोककळा; प्रसिद्ध शास्त्रीय गायक काळाच्या पडद्याआड

'Jolly LLB 3'चा डंका! 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री, अक्षय कुमार -अर्शद वारसीची जोडी सुपरहिट

Alia Bhatt: केसरिया तेरा इश्क है पिया...

SCROLL FOR NEXT