Pooja Khedkar case : Saam tv
मुंबई/पुणे

Pooja Khedkar case : खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत भर; पूजा यांच्याकडून अटक टाळण्यासाठी कोर्टात जामीन अर्ज, वडिलांवरही गुन्हा

Pooja Khedkar News update : पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. पूजा खेडकर यांच्याकडून अटक टाळण्यासाठी त्यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. तर पुण्यात वडिलांवरही गुन्हा नोंद झाला आहे.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप, अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. पूजा खेडकर यांच्या आईला काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला. त्यानंतर आता पूजा यांच्या वडिलांवरही गुन्हा दाखल झाला आहे. तर पूजा यांनीही अटक टाळण्यासाठी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात पूजा खेडकर यांचं संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडलं आहे.

पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा दिल्ली गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी गुन्हे शाखेने अटक करू नये, यासाठी पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर होणार का?

पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकूपूर्व जामीन मिळावा, यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद सिंगल यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

पटियाला हाऊस कोर्टाने १ ऑगस्ट रोजी पूजा यांचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालय कायम ठेवत की पूजा खेडकर यांना दिलासा देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पूजा खेडकर यांच्या वडिलांवर गुन्हा

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर विरोधात पुण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार बुधवारी पोलिसांकडे देण्यात आली होती. पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा यांना स्वतंत्र केबिन द्यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT