MPSC आयोगा विरोधात न्यायालयात गेलेल्या आणखी 251 विद्यार्थ्यांना दिलासा SaamTv
मुंबई/पुणे

MPSC आयोगा विरोधात न्यायालयात गेलेल्या आणखी 251 विद्यार्थ्यांना दिलासा

न्यायालयीन लढाई लढलेल्या मुलांनाचं याच फायदा झालाय बाकीच्या विद्यार्थ्यांचं पुढे काय? असा प्रश्न उपस्थीत झाला होता.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) संयुक्त पूर्व परीक्षा PSI-STI 2021 घेण्यात आली होती त्यात आयोगाकडून आलेल्या Answer Key मध्ये काही बरोबर असलेले प्रश्नही रद्द करण्यात आले होते. त्यामुळे 2 ते 3 हजार मुलांची काहीही चूक नसताना केवळ MPSC ने दिलेल्या चुकीच्या Answer Key मुळे  ही मुलं नापास झाली होती. यातील जवळपास 86 मुलांनी त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्याचा निर्णय आज मुलांच्या बाजुने आला होता. न्यायालयाने या 86 मुलांना मुख्य परीक्षेसाठी बसण्याची मंजुरी दिलेली आहे.

न्यायालयीन लढाई लढलेल्या मुलांनाचं याच फायदा झालाय बाकीच्या विद्यार्थ्यांचं पुढे काय? यामुळे उर्वरित 400 विद्यार्थ्यांनी मुंबई, औरंगाबाद, नागपूर या खंडपीठात मुलांनी MPSC संयुक्त पूर्व परीक्षा PSI-STI २०२० मध्ये मुख्य परीक्षेत बसू देण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल लागला आहे. नागपूर खंडपीठाने 9 विद्यार्थ्यांना मुंबई खंडपीठाने 161 विद्यार्थ्यांना, औरंगाबाद खंडपीठाने 88 विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. ज्याप्रकारे 86 मुलांना मुख्य परीक्षेला बसू दिले आहे त्याप्रमाणे आम्हालाही मुख्य परीक्षेत बसू द्यावे ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. त्यामुळे औरंगाबाद, मुंबई, नागपूर खंडपिठाचा निकाल विद्यार्थांच्या बाजूने लागला आहे. आयोगाने 4 थी Answer Key प्रकाशित करावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घ्यावे ही प्रमुख मागणी आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT