Mallikarjun Kharge Saam tv
मुंबई/पुणे

Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: 'खोटं बोला पण रेटून बोला...'; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा PM मोदींवर हल्लाबोल

Mallikarjun Kharge: 'मोदी खोटं बोलतात, पण लोकांना ते खरं वाटतं. मराठीत एक म्हण आहे, खोटं बोला पण रेटून बोला, असं ते करतात, अशा शब्दात मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

Vishal Gangurde

Mallikarjun Kharge on pm Narendra Modi:

इंडिया आघाडीची महत्वाची बैठक मुंबईत सुरू आहे. २६ पक्षांची ही 'इंडिया' आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत सुरु आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. 'मोदी खोटं बोलतात, पण लोकांना ते खरं वाटतं. मराठीत एक म्हण आहे, खोटं बोला पण रेटून बोला, असं ते करतात, अशा शब्दात मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ' आज बैठक झाली. ती अत्यंत चांगली झाली. या बैठकीचा उद्देश काय होता हे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. याचा प्रयत्न आम्ही बऱ्याच दिवसांपासून करत होतो. बेंगळुरूमध्ये बैठक झाली, त्याआधी पटनाला बैठक झाली. त्याआधी सगळ्यासाठी माझ्या घरी बैठक झाली. तेव्हा अनेक नेते बैठकीस होते. त्यानंतर नितीश कुमार यांच्याकडे पहिली बैठक घेण्याचं ठरवलं'.

'महागाई, बेरोजगारी याविरोधात लढण्यासाठी एकत्र आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सिलिंडर गॅस कमी केला पण अजूनही 700 रुपये सिलिंडर आहे. मोदी गरिबांसाठी काम करणार नाहीत. आता गरिबांचा पैसा जात आहे, तो थांबवण्यासाठी इंडिया आघाडी जिंकणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार केले आहेत. त्यानुसार काम करणार आहे, असेही ते म्हणाले.

' मोदी सरकार स्वायत्त संस्थांचा सत्यानाश करत आहेत. मणिपूर जळत होतं, तेव्हा विशेष अधिवेशन बोलावलं नाही. कोव्हिड, नोटाबंदी झाली, तेव्हाही अधिवेशन बोलावलं नाही. आता का अधिवेशन बोलावलं, हे माहीत नाही. हळूहळू हुकूमशाही येत आहे. माध्यामांवरही निर्बंध आणले जात आहेत. पत्रकारांच्या लिखाणावर निर्बंध आणले जात आहेत, असे ते पुढे म्हणाले.

'पुढील बैठक कुठे आणि कधी घेणार हे आम्ही ठरवू आणि सांगू. आम्हाला ते घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला आम्ही घाबरणार नाही. पुढेही सार्वजनिक बैठका होतील, त्या कुठे होतील, त्याबाबत माहिती देऊ. मोदी खोटं बोलतात, पण लोकांना ते खरं वाटतं. मराठीत एक म्हण आहे, खोटं बोला पण रेटून बोला, असं ते करतात, अशी टीका खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Forts : मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक! महाराष्ट्रातील ७ अभेद्य किल्ले, शत्रूला जिंकणे होतं कठीण

Maharashtra News Live Update: ऊस दराच्या मागणीसाठी आमदार सदाभाऊ खोत,यांचा मशाल मोर्चा

IND vs NZ : भारताने पुन्हा नाणेफेक जिंकली; प्रथम फलंदाजी कोण करणार? पाहा प्लेईंग ११

Actor Threat Case : बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक, चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Accident : धनत्रयोदशीला काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत ६ जण जागीच ठार, ७ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT