Baramati bypoll  Saam tv
मुंबई/पुणे

बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात तगडा उमेदवार मैदानात उतरणार? काँग्रेसच्या बैठकीत काय शिजलं? वाचा

Baramati bypoll news : बारामतीत पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक झाली.

Vishal Gangurde

बारामतीत पोटनिवडणुकीची राजकीय चुरस वाढणार

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार

काँग्रेसकडून तगडा उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय

सागर आव्हाड, साम टीव्ही

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. एकीकडे राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तयारी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. आता या पोटनिवडणुकीत काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनुसार, पक्षाकडून आदेश आल्यास सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसचा तगडा उमेदवार मैदानात उभा राहण्याची शक्यता आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. अजित पवार यांच्या रिक्त विधानसभा जागेवर काँग्रेस पोटनिवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गटाने निवडणूक लढवली नाही, तर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिले तर निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्हा काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवला आहे. वरिष्ठ नेतृत्वांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढेल, असे पुणे जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. पुणे काँग्रेस भवन इथे ही बैठक पार पडली. एकीकडे शरद पवार गटाने पोटनिवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर मोठं भाष्य केलं होतं. 'बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवार गटाने भूमिका स्पष्ट करावी. लोकसभा ,विधानसभा निवडणूकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लढवली होती. ते जर लढत नसतील, तर त्यानंतर आमच्या कडे अनेक पर्याय असतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अशोक खरात आणि सनदी अधिकाऱ्यांच्या एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशी सुरू

WhatsApp Update: खुशखबर! WhatsApp चॅटींगसाठी फोन नंबरची गरज नाही? वाचा नव्या फीचरची संपूर्ण माहिती

Suraj Chavan : सूरज चव्हाणला व्हायचंय साऊथचा हिरो; 'पुष्पा'सोबत चित्रपट करणार? सांगितलं अल्लू अर्जुनसोबत काम करण्याचं प्लानिंग

Plane Crash : १२५ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात; ६६ जणांचा मृत्यू

Hair Dandruff Removal Tips: केसांतला कोंडा घालवण्यासाठी घरच्या घरी करा 5 सोपे उपाय

SCROLL FOR NEXT