Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

"कुठे ते प्रबोधनकार अन् कुठे हे महाराष्ट्र पेटवणारे 'दुर्बोधन'कार''

'कुठे ते पुरोगामी महाराष्ट्राचे प्रबोधन करणारे प्रबोधनकार आणि कुठे हे भाजपाचा भोंगा बनून महाराष्ट्र पेटवणारे 'दुर्बोधन'कार'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : औरंगाबादमध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होत आहे. गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तसंच राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला असतानाच आज त्यांच्या सभेच्या व्यासपिठावरती ठेवण्यात आलेल्या फोटोंवरुन काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरेंची ज्या व्यासपिठावरुन बोलणार आहेत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्यासह प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी ट्विट करत राज यांना 'दुर्बोधन'कार म्हंटल आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले सोडा स्वतःच्या आजोबांचे विचार ही यांना मान्य नाहीत. कुठे ते पुरोगामी महाराष्ट्राचे प्रबोधन करणारे प्रबोधनकार आणि कुठे हे भाजपाचा भोंगा बनून महाराष्ट्र पेटवणारे 'दुर्बोधन'कार. असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह पोलिसांचा पहारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

Tapovan Tree Cutting: 'आमच्या तपोवनाला हात लावू नये...'; नाशिक तपोवन वृक्षतोडीविरोधात मराठी कलाकारांचा संताप

Chia Seeds: थंडीत सब्जा खा; त्वचा, वजन आणि तब्येतीसाठी उपयोगी

Sanchar Saathi App: एका दिवसात ६ लाख लोकांनी डाउनलोड केला 'संचार सारथी'; अ‍ॅपची खासियत आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT