kalyan news  Saam tv
मुंबई/पुणे

काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला; नगरसेविकेने बड्या नेत्याला कानफटवलं

kalyan News : काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. नगरसेविकेने बड्या नेत्याला कानफटवल्याची घटना उघडकीस आली आहे.

Vishal Gangurde

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

नगरसेविकेकडून जिल्हाध्यक्षांना कानशि‍लात

कल्याणमध्ये काँग्रेसच्या बैठकीत राडा

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांना भर बैठकीत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पक्षातील अंतर्गत वाद उघडपणे समोर आले आहेत.

कल्याण पूर्वेत शनिवारी संध्याकाळी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक पुढे आल्याने पक्षात आधीपासूनच हालचाली वाढल्या होत्या. काही दिवसांपूर्वी पदाधिकारी पलक वर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन संघटनात्मक कामकाज आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरच पार पडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर इच्छुकांमध्ये चुरस वाढली होती.

या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीदरम्यान नाश्त्याच्या व्यवस्थेवरून चर्चा सुरू असताना एका कार्यकर्त्याने नगरसेविका कांचन कुलकर्णी यांना जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी त्यांच्याबद्दल शिवीगाळ केल्याची माहिती दिली. ही बाब कळताच संतप्त झालेल्या कुलकर्णी यांनी थेट पातकर यांना गाठत भर बैठकीतच त्यांना कानशिलात लगावल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर बैठकीत एकच गोंधळ उडाला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. एका महिला नगरसेविकेबाबत जिल्हाध्यक्षांकडून अशा प्रकारची भाषा वापरणे कितपत योग्य आहे, असा सवालही काही कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी राजा पातकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. या घटनेमुळे कल्याणमधील राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कानशिलात लगावणाऱ्या नगरसेविकेवर पक्षाकडून काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT