Baba Siddique will be join Ajit pawar NCP  SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : कन्फर्म ! बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार, तारीख आणि ठिकाण ठरलं!

Baba Siddique News : माजी मंत्री बाबा सिद्दीकी अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.

Nandkumar Joshi

सूरज मसूरकर, मुंबई

Baba Siddique will be join Ajit pawar NCP :

माजी मंत्री बाबा सिद्दीकी अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. सिद्दीकी यांनी आज, गुरुवारी एक्स पोस्टद्वारे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) तोंडावर काँग्रेसला मुंबईत मोठे धक्के बसले आहेत. ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. स्वतः सिद्दीकी यांनी आज, गुरुवारी सकाळी सोशल मीडिया पोस्टद्वारे सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली होती. मात्र, ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत स्पष्ट काही सांगितले नव्हते. मात्र, ते आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. तसे बॅनर मुंबईत झळकले आहेत.

पक्षप्रवेशाची तारीख आणि ठिकाण ठरलं!

बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं असून, त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख आणि ठिकाणही ठरलं आहे. मुंबईत बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे पोस्टर झळकले आहेत. या पोस्टरवर बाबा सिद्दीकी यांच्यासह अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो आहेत. सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश सोहळा १० फेब्रवारीला संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहत येथील क्रिडांगणावर होणार असल्याचा उल्लेखही आहे.

राजीनामा देताना काय म्हणाले होते सिद्दीकी?

बाबा सिद्दीकींनी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याची पोस्ट एक्सवर शेअर केली होती. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तरुणपणातच मी काँग्रेसशी जोडलो गेलो होतो. मागील ४८ वर्षांचा हा प्रवास अत्यंत महत्वाचा असा होता. मला बरंच काही बोलायचं होतं, पण काही गोष्टी न बोललेल्याच चांगल्या असतात, असं सांगतानाच, राजकीय प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT