Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: कुर्ल्यात कंपाउंडची भिंत कोसळली, १८ वर्षीय मुलीचा मृत्यू

Mumbai Kurla News: कुर्ल्यात कंपाउंडची भिंत कोसळली, १८ वर्षीय मुलीचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Kurla News: कुर्ला येथील सुभाष नगर येथे कंपाउंड भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका १८ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सीपी कंट्रोलने ग्राउंड प्लस टू इमारतीची कंपाऊंड भिंत कोसळून शेजारील चाळीवर पडली असल्याची माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील शिव मंदिराजवळील सुभाष नगरजवळील ग्राउंड प्लस टू इमारतीची कंपाऊंड भिंत कोसळली. या घटनेत वैष्णवी प्रजापती (१८) ही तरुणी गंभीर जखमी झाली होती.

जखमी तरुणीला कुर्ला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. मात्र उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

भिवंडीमध्ये कारखान्याची भिंत कोसळून एकाचा मृत्यू

दरम्यान, मागील महिन्यात भिवंडीमध्ये एका कारखान्याची भिंत कोसळल्याची घटना घडली होती. ढिगाऱ्याखाली दोन अल्पवयीन मुलं अडकली होते. यामधील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता.

मागील महिन्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भिवंडी शहरातील दिवानशाह दर्गा रोडवरील ४० ते ५० वर्षे जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याची घटना घडली होती. या भिंतीच्या शेजारी खेळणारी दोन अल्पवयीन मुलं ढिगाऱ्याखाली अडकली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगारा बाजूला करुन दोन्ही मुलांना तात्काळ ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. यामधील एका मुलाचा जागीच मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Pune : पुण्यात रिलस्टारकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर; कारवाईचे आदेश

२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

SCROLL FOR NEXT