Chandrakant Patil Saam TV
मुंबई/पुणे

चंद्रकांत पाटलांच्या अडचणीत वाढ; राज्य महिला आयोगाकडे तक्रार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी -

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता पाटील यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याकडे लिगल सेलकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन (OBC REservation) राज्यातील भाजपनेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, भाजपने काल भाजप मुंबई कार्यालय ते मंत्रालयावर मविआ सरकारविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी ओबीसी आरक्षणासाठी संपर्क केला, पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितले नाही',अशी प्रतिक्रिया दिली होती.

हे देखील पाहा -

सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, 'तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा, स्वयंपाक करा. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी दिल्लीत जा,अन्यथा मसणात जा पण आरक्षण द्या; तुम्ही खासदार असून तुम्हाला एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची हे कळत नाही?' अशा कडक शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेमुळे पाटील य़ांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात येत आहे. अशातच आता पाटील यांच्या विरोधात वकील असिम सरोदे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पाटील यांच्या या विधानावरुन शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) म्हणाल्या, माध्यमांशी बोलताना भाजपकडून महिलांबाबत नेहमीच खालच्या पातळीवर टीका केली जाते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने सध्या महागाईशी लढणाऱ्या देशभरातील सर्व महिलांचा अपमान झाला असून, सुप्रिया सुळेंसह देशभरातील महिलांची चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी असं वक्तव्य केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT